Between The Lines – बिटवीन द लाइन्स
Our Price
₹300.00
Product Highlights
कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? – अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून ‘आत’ल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार्या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्याद गुरूजनांची, भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखर्याा पूर्णविरामांची…ही शब्द ‘चित्रं’!
– अपर्णा वेलणकर
in stock
Brand
चंद्रमोहन कुलकर्णी

Reviews
There are no reviews yet.