BE THE CHANGE FIGHTING CORRUPTION – बी द चेन्ज भ्रष्टाचाराशी लढा
₹150.00
Product Highlights
भ्रष्टाचार, भारतीय शासनकारभाराच्या यंत्रणांत इतका खोलवर झिरपला आहे, की सामान्य माणसाचा सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेवरचा विश्वासच उडाला आहे. इथली राजकीय, तपासविषयक व कायदा यंत्रणा संपूर्णत: दुरुस्त झाल्याशिवाय भ्रष्टाचाराचा हा प्रचंड फैलावलेला आजार बरा होणार नाही.आज आपल्याला, आपल्या अवतीभोवती काय दिसतं? फक्त लूटालूट प्रचंड लूटालूट… आपण आकड्यावरची शून्यं मोजू शकणार नाही इतकं याचं भयंकर स्वरुप आहे…आणि राष्ट्रकुल स्पर्धेतला प्रकार उघडकीस येऊ लागला तेव्हा मला त्या प्रकारचा भयंकर त्रास होऊ लागला. त्याविरोधात उठवणा-या आवाजात मीही सहभागी होऊ लागले. आता हा आवाज आज खूप मोठा झाला आहे. कधीकधी तो फार कर्कश होतो.. पण मुद्दाम नाही, परिस्थिती भाग पाडते. पण हे सगळं चाललं आहे ते एकाच उद्देशासाठी … सुराज्य भारत घडवण्यासाठी … आपल्या सर्वांना समृद्ध आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षितता देणारा अधिक चांगला भारत घडवायचा आहे. या लेखसंग्रहामागची प्रेरणा तीच आहे.जर भ्रष्टाचारी लोक त्यांच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात तर त्यांचा बळी ठरणारे आपण सर्वजण आपल्या स्वत:साठीच का एक होऊ शकत नाही? ‘बी द चेंज!
Description
VOTED AS “INDIA’S MOST ADMIRED” AND “MOST TRUSTED WOMAN” KIRAN BEDI IS A RECOGNISED FACE IN INDIA. SHE HAS BEEN A RECIPIENT OF PRESTIGIOUS DECORATIONS, MOST NOTABLE BEING, THE RAMON MAGSAYSAY AWARD IN GOVERNMENT SERVICE, AND THE PRESIDENT’S POLICE MEDAL FOR GALLANTRY.
Brand
KIRAN BEDI
Birth Date : 09/06/1949
किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे १९४९ साली झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. आयआयटी, दिल्ली येथून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार (सामाजिक शास्त्र विभाग) या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. त्या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनियर टेनिस चॅम्पियन होत्या. आशियाई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले. निवडक मानसन्मान १९९४ मध्ये फिलिपीन्सच्या रेमन मॅगसेसे फौंडेशनचा शांतता पुरस्कार. हा पुरस्कार प्रथमच आशियातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला मिळाला. सर्वांगीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशील व्यवस्थापनासाठी जोसेफ बायस फाउंडेशनचा (स्वित्झर्लंड) पुरस्कार. भारतातील न्यायव्यवस्थेत लक्षणीय बदल घडवून आणू शकेल असे कार्य केल्याबद्दल मॉरिसन टॉम गिशॉफ पुरस्कार (युएसए). मानव कल्याण, स्त्रियांचे हक्क, विशेष सेवा आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या बांधिलकीसाठी प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार (युएसए). भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस शौर्य पदक. अमली पदार्थ सेवन प्रतिबंधाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल नॉर्वेच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ गुड टेम्प्लार्स संघटनेतर्फे एशिया रीजन अॅवॉर्ड. मद्य, मादक पदार्थ, एड्स आणि तंबाखूसेवन याविरुद्ध मोहीम उघडून लोकांच्या आयुष्याची प्रत सुधारल्याबद्दल इंटरनॅशनल इक्युमेनिकल फोरम या असोसिएशन ऑफ खिश्चन कॉलेजेस अॅन्ड युनिव्र्हिसटीजतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. मदर टेरेसा अॅवॉर्ड, २००५. याशिवाय पोलीस क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्यासाठी गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर आणि द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्याकडून अनुक्रमे २००३ व २००५ साली त्यांना मानद डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले.
Reviews
There are no reviews yet.