ASMITA – अस्मिता
₹340.00
Product Highlights
अस्मिता फुरसुंगीकर, भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील या पोलीस अधिका-यांवर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्ल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरू झाला जीवघेणा संघर्ष. सर्पराजमहाराज कोण? श्री गुरुमणी कोण? आणि या सर्व प्रकरणाची सुरुवात करणारे माणगावकर वकील कोण? रक्तरंजित थरारक प्रकरणात संजय अस्मिताची सुटका करण्यात यशस्वी होतो का? रोमहर्षक, नाट्यमय, वेगवान साहित्यकृती.
Description
ASMITA FURSUNGIKAR, DAUGHTER OF AN INDIAN ARMY COLONEL IS KIDNAPPED. POLICE OFFICER NAMED SANJAY PATIL IS ASSIGNED JOB TO FIND HER OUT.MALAD RIVER, JAHAGIRDAR REPORT, MUSHEE KATAYAR, MRITUNJAY YAJNA, GHARPURI ISLAND, IRADI GODDESS, THE MYSTERY AT THE CELLAR IN THE ALIBAUG FORT.FROM MUMBAI TO ALIBAUG FORT IN THE SEARCH OPERATION SANJAY STANDS BEFORE SIDDHIPURUSHA SARPRAJ MAHARAJ OF AGHORPANTH. TO FACE HIM SANJAY HAD TO TAKE HELP OF SHRI GURUMANI FROM THE SPIRITUAL WORLD. AND THEN STARTS, THE BLOODY BATTLE. WHO IS SARPRAJ MAHARAJ ? WHO IS SHRI GURUMANI ? AND WHO IS MANGAOKAR VAKIL, WHO STARTED ALL THESE EVENTS? DID SANJAY SUCCEDE TO EXTRICATE ASMITA IN BLOODY BREATHTAKING BATTLE? HAIR RAISING, DRAMATIC, FAST, LITERARY WORK!!!!!
Brand
SURYAKANT JADHAV
सूर्यकांत जाधव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मौजे कोलोली येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस्सी.(ऑन), एलएल.बी.(स्पे.) पर्यंत कोल्हापूर येथे झाले आहे. त्यानंतर ते शासकीय सेवेत मंत्रालय, मुंबई येथे सहसचिव या पदावर कार्यरत होते. श्री. जाधव यांना लहानपणापासूनच वाचन, चित्रपट, कला याची आवड आहे. त्यांनी ज्योतिर्विद्येचा व पेंटिंगचा विशेष अभ्यास केला आहे. विज्ञान आणि विधी पदवीधर असल्याने त्यांनी विविध विषयावरील वाचन केले आहे.
Reviews
There are no reviews yet.