AS I SEE BHARTIYA POLICE SEVA – ॲज आय सी भारतीय पोलीस सेवा
₹150.00
Product Highlights
“आपण सर्व स्वत:च्या कृतीचे पोलीस झालो तर ती फार मोठी क्रांती ठरेल.“ “सुधारणा, वाईट गोष्टी रोखणे आणि चांगल्याचा अंमल करणे, यासाठी पोलीससेवेची सत्ता वापरता येते.“ “ही सेवा मानवी हक्कांचे संरक्षण करू शकते अन् पायमल्लीही करू शकते. यातील काय निवडायचे ते या सेवेत असणारे आणि येऊ पाहणारे, यांनीच ठरवायचे आहे.“ “आज आपल्या देशातील पोलीससेवा काही राजकारणी वापरतात. आपला वापर होऊ द्यायचा की नाही हे आपणच ठरवू शकतो.“ “ही सेवा सुलभ आणि परिणामकारक व्हायची असेल, तर सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करायला हवी. असे द्रष्टे, कुशल, समर्पित नेतृत्व या सेवेतून पुढे यायला हवे अन् ते तळापर्यंत झिरपायला हवे आहे.“ पोलीससेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि नीतिमान कशी होईल यावर आपल्या दीर्घ, डोळस अनुभवाचे विचार मांडणाया डॉक्टर किरण बेदी, वाचकांना या पुस्तकाद्वारे आपल्या संवेदना, सहभाग आणि प्रतिक्रिया देण्यासाठी उद्युक्त करतात.
Description
IT WILL BE A REVOLUTION IF WE ALL COULD BECOME THE POLICE OF OUR ACTIONS. THE POLICE ADMINISTRATION CAN BE USED TO STOP THE BAD THINGS AND TO START THE GOOD THINGS. POLICE SERVICE CAN PROTECT THE HUMAN RIGHTS BUT IT CAN ALSO VIOLATE THE HUMAN RIGHTS. IT IS UP TO THOSE WHO ARE ALREADY THERE IN THESE SERVICES AND THOSE WHO ARE GOING TO BE A PART OF THESE SERVICES TO MAKE A CHOICE BETWEEN THESE TWO. TODAY, SOME POLITICIANS ARE USING THE POLICE SERVICES FOR THEIR OWN BENEFIT, BUT THEN IT IS THE POLICE WHO HAVE TO DECIDE WHETHER HE/SHE SHOULD BE USED IN THIS WAY OR NOT? IF WE REALLY WANT THESE SERVICES TO BE SIMPLE AND MOST EFFECTIVE, THEN WE MUST WALK ON THE PATH OF TRUTH AND NONVIOLENCE. WE NEED SUCH LEADERSHIP WHICH IS VISIONARY, WHICH IS SKILLFUL, WHICH IS DEVOTED. SUCH A LEADERSHIP SHOULD REACH THE BOTTOM OF THE SOCIETY. DR. 106~ WRITES HER VIEWS ABOUT MAKING THE POLICE SERVICES MORE EFFECTIVE, VIRTUOUS, AND FRIENDLY. SHE ALSO GIVES US A CALL TO JOIN IN WITH OUR FEELINGS, PARTICIPATION AND REACTIONS.
Brand
KIRAN BEDI
Birth Date : 09/06/1949
किरण बेदी यांचा जन्म अमृतसर येथे १९४९ साली झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. आयआयटी, दिल्ली येथून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन आणि घरगुती हिंसाचार (सामाजिक शास्त्र विभाग) या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. त्या राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनियर टेनिस चॅम्पियन होत्या. आशियाई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी परदेशात भारताचे प्रतिनिधित्व केले. निवडक मानसन्मान १९९४ मध्ये फिलिपीन्सच्या रेमन मॅगसेसे फौंडेशनचा शांतता पुरस्कार. हा पुरस्कार प्रथमच आशियातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला मिळाला. सर्वांगीण आणि नावीन्यपूर्ण प्रयोगशील व्यवस्थापनासाठी जोसेफ बायस फाउंडेशनचा (स्वित्झर्लंड) पुरस्कार. भारतातील न्यायव्यवस्थेत लक्षणीय बदल घडवून आणू शकेल असे कार्य केल्याबद्दल मॉरिसन टॉम गिशॉफ पुरस्कार (युएसए). मानव कल्याण, स्त्रियांचे हक्क, विशेष सेवा आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या बांधिलकीसाठी प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार (युएसए). भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस शौर्य पदक. अमली पदार्थ सेवन प्रतिबंधाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल नॉर्वेच्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ गुड टेम्प्लार्स संघटनेतर्फे एशिया रीजन अॅवॉर्ड. मद्य, मादक पदार्थ, एड्स आणि तंबाखूसेवन याविरुद्ध मोहीम उघडून लोकांच्या आयुष्याची प्रत सुधारल्याबद्दल इंटरनॅशनल इक्युमेनिकल फोरम या असोसिएशन ऑफ खिश्चन कॉलेजेस अॅन्ड युनिव्र्हिसटीजतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. मदर टेरेसा अॅवॉर्ड, २००५. याशिवाय पोलीस क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्यासाठी गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर आणि द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्याकडून अनुक्रमे २००३ व २००५ साली त्यांना मानद डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले.
Reviews
There are no reviews yet.