₹160.00
“‘फुलांचे बोल’, ‘कथांतर’ आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे ‘अंतर-पर्व’. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन – यासारखे जगप्रसिद्ध लेखक हे या पर्वाचे मानस्तंभ. या शीर्षकाचा एवूÂण संकेतच अनुवाद विश्वाचं महत्त्व व्यक्त करणारा आहे. अनुवाद केवळ भाषाभाषांतील व्याकरण-रचना व विभक्ती, संधी-समास यातील फरक दाखवत नाहीत, तर भौगोलिक परिमाणांनी दूर केलेल्या माणसांना जवळ आणतात. रशियन कथा मराठीत वाचल्यावर हटवूÂन आपल्याला वाटतंच – ‘‘अरे, यात वेगळंसं काय आहे? ही माणसं, त्यांचे स्वभाव आणि गुणदोष आपल्या अवती-भवतीच्या माणसांची आठवण करून देत नाहीत का? आपल्या मराठी कथा या लोकांना रशियन भाषेत वाचायला दिल्या तर?’’ द्यायलाच पाहिजेत. त्याद्वारेच अंतर दूर करणारं हे पर्व चालू राहील. सह-अनुभूतीचं, सादृश मूल्यांचं आणि सौहार्दाचं. हेच या शीर्षकाचं सांगणं आहे. आपण हे समजून घेऊ व एकजुटीनं या पर्वाचे पाईक होऊ. “
ANOTHER BEAUTIFUL SET OF MARATHI TRANSLATION BY SUNITI DESHPANDE OF RUSSIAN STORIES WRITTEN MOSTLY DURING JOSEPH STALIN`S MERCILESS RULE OF RUSSIA.
Reviews
There are no reviews yet.