ANSAR – अणसार
₹350.00
Product Highlights
प्रसिद्ध गुजराती लेखिका वर्षा अडालजा यांची ‘अणसार’ ही कादंबरी म्हणजे प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला अंतर्मुख करणारी आणि जीवनमूल्यंच तपासून पाहण्यास उद्युक्त करणारी कलाकृती आहे. ‘अणसार’ म्हणजे देवाची घंटा! प्रत्येकाच्या मनात एक देवाची घंटा असते. मनात सद्-असद् प्रवृत्तींचा संघर्ष चालू असतो. संवेदनशील व्यक्तीच्या मनात जेव्हा त्या देवाच्या घंटेच्या आवाजाची प्रथम चाहूल येते आणि तो संघर्ष अस्तित्वलाच आव्हान देतो, तेव्हा त्या घंटेला टोल ऐकू येतो आणि माणसाचं ‘माणूस’पणच पणाला लागतं! ‘माणूस’पण असंच पणाला लागलेल्या एका आजारी रूपाची ही संघर्ष कहाणी. माणसाचं मन हे अमूर्त आणि अनाकलनीय असतं, माणसाचं ‘दिसणं’, आणि मनाचं ‘असणं’ हे फार फार क्वचित ‘एकत्र’ येतं; आणि एकत्र येतं, तेव्हा एक ‘अवतारी पुरुष’ प्रगट होत असतो – आणि तो तर ‘संभवामि युगे युगे’ असा असतो. परंतु अशा अवतारी पुरुषाची ‘वाट’ न पाहता, माणसानं ‘माणसा’सारखं विचार करणं आणि जगणं ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच मदर तेरेसा म्हणतात : ‘जगातला सर्वात भयानक रोग कॅन्सर किंवा कुष्ठरोग नाही; परंतु जगात कोणाला माझी गरज नाही, मी कोणाला आवडत नाही आणि कोणालाही माझी पर्वा नाही, अशी भावना मनात निर्माण होणं, ही सर्वात महाभयंकर व्याधी आहे.’
Description
THE NOVEL `ANASAR`, BY THE RENOWNED GUJARATI WRITER VARSHA ADALJJA, IS AN ARTWORK THAT INSPIRES EVERY SENSITIVE PERSON AND WANTS TO CHECK THE VALUE OF LIFE. `ANASAR` IS GOD`S HOUR! EVERYBODY HAS A GOD BELL IN MIND. IN THE MIND, THERE IS A CONTINUATION OF OUR INCLINATIONS. WHEN THE SENSITIVE PERSON`S MIND COMES FIRST IN THE SOUND OF THE HOUR`S SOUND AND WHEN THE STRUGGLE CHALLENGES THE EXISTENCE, IT WILL TAKE A TOLL ON THAT HOUR AND THE PERSON`S `MAN` HAS TO FACE! THE STRUGGLE OF A MAN WHO HAS EXPERIENCED SUCH A SICK MAN IS A STORY OF A SICK PERSON. MAN`S MIND IS UNINTELLIGIBLE AND MYSTERIOUS, MAN`S APPEARANCE, AND BEING `VERY HEART` COMES VERY RARELY `UNITE`; AND WHEN IT COMES TOGETHER, A `AVATARA MAN` IS MANIFESTED – AND THAT IS `SAMBHAVAMY YUGA YUGA`. BUT WITHOUT LOOKING AT THE PERSON`S `WAITING`, SUCH A PERSON IS THINKING LIKE `MAN` AND LIVING IS ONE OF THE MOST IMPORTANT THINGS. THAT IS WHY MOTHER TERESA SAYS: `THE MOST DREADED DISEASE IN THE WORLD IS NOT CANCER OR LEPROSY; BUT IN THE WORLD, THERE IS NO NEED FOR ME, I AM NOT INTERESTED IN ANYONE AND NO ONE CARES ABOUT ME, IT IS THE MOST FORMIDABLE DISORDER.
Brand
ADALJA VARSHA
Birth Date : 10/04/1940
वर्षा महेंद्र अडालजा या गुजराती साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. वडील लेखक. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण. अभिजात नाटकांमध्ये मध्यवर्ती भूमिका. काही भूमिकांसाठी पुरस्कार. मुंबई विद्यापीठातून भाषा या विषयांत बी. ए. आणि समाजशास्त्र या विषयात एम. ए., ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून काम. अन्सार या कादंबरीचं नाट्यरूपांतर, आकाशवाणीवरून क्रमश: वाचन. या कादंबरीच्या गुजरातीमध्ये अनेक आवृत्त्या प्रकाशित. राजस्थानी भाषेत अनुवाद. दिल्लीच्या साहित्य अकादमीकडून नुकताच इंग्रजी भाषेत अनुवाद. या कादंबरीसाठी दिल्लीचा साहित्य अकादमी पुरस्कार, गुजरात विद्या सभेचा पुरस्कार, कोलकत्त्याच्या भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार प्राप्त. अनेक कादंबऱ्यावर दूरदर्शन मालिकांची निर्मिती. त्यातील काहींना पुरस्कार प्राप्त. कादंबऱ्या, लघुकथा संकलनं, नाटकं, निबंध, प्रवासवर्णनं, संपादित पुस्तकं अशी जवळपास ५० पुस्तकं नावावर जमा. चाळीस वर्षांपासून गुजराती साहित्य परिषदेच्या निर्वाचित सदस्य. गुजराती साहित्य अकादमीच्या सल्लागार, गुजराती साहित्य परिषदेच्या उपाध्यक्ष इ. पदे भूषविली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भरलेल्या साहित्यविषयक परिषदेत आणि लंडनच्या बुक फेअरमध्ये सहभाग. साहित्यातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, पत्रकारितेतील योगदानासाठी गुजरातच्या पत्रकार संघाचा पुरस्कार. लघुकथा संकलनासाठी, कादंबऱ्यासाठी गुजराती साहित्य अकादमी, महाराष्ट्र-गुजराती साहित्य अकादमी, गुजरात सरकार तर्फे विविध पुरस्कार. गुजरात गव्हर्नमेन्ट फिल्म बोर्डाचा पुरस्कार, के. एम. मुन्शी पुरस्कार, सोव्हिएत लॅन्ड नेहरू पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित. नुकत्याच प्रकाशित क्रॉसरोड पुस्तकास दर्शक अॅवॉर्ड.
Reviews
There are no reviews yet.