ANOLAKH – अनोळख
Our Price
₹120.00
Product Highlights
‘अनोळख’ या शांताबार्इंच्या कवितासंग्रहात आधीच्या ‘गोंदण’मध्ये प्रकट झालेल्या अनेक वैशिष्ट्यांचा अधिक सुजाण असा विकास आहे, असे आढळून येते. ‘अनोळख’मधल्या कवितांत प्रथमच प्रकट होत असलेली एक भाववृत्ती म्हणजे निसर्ग, भोवतालचे परिचित जग यांच्याविषयी कवयित्रीला जाणवू लागलेली अनोळखीची, परकेपणाची, दुराव्याची भावना होय. ‘अनोळख’मधल्या अनेक कविता या अशा दुराव्याचे दर्शन ठसठशीतपणे घडवतात. ‘त्वचेच्या आडपडद्याने’, ‘बहर’, ‘पडदानशीन’, ‘कोसळतात परके समुद्र’, इत्यादी कवितांतून ही भावना व्यक्त होते. पूर्वीचे स्थिर जीवन पायांखालून निसटू लागले आहे, या जाणिवेमुळे मनाला आलेले भांबावलेपण आणि स्वत:च्या एकाकीपणातून गडद होत चाललेली व्याकुळता यांचा उत्कट, मन उदास करणारा प्रत्यय म्हणजे ‘अनोळख’मधल्या अनेक कविता.
in stock
Reviews
There are no reviews yet.