ANANDACHA PASSBOOK – आनंदाचं पासबुक
₹350.00
Product Highlights
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. श्याम भुर्के यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली. साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली. वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, राम गबाले, भीमसेन जोशी, शरद तळवलकर, सुरेश भट, वामनराव चोरघडे, प्रा. शिवाजीराव भोसले अशा अनेक नामवंतांसंबंधीच्या आठवणी आनंददायी आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या समाजकार्यात सहभागी होता आले. खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप–वि.स. खांडेकर, साहिाQत्यक सावरकर, गोनीदां-एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवलकर–गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून ज्येष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपर्यंत पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे. ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.
Description
INTERESTING AUTOBIOGRAPHY OF BANKER – ANANDACH PASSBOOK. HERE IS A BANKER SHYAM BHURKE WHO SERVED PEOPLE THROUGH HIS EMPLOYMENT IN BANK OF MAHARASHTRA. THE BANK WAS INSTRUMENT IN HIS HAND TO MAKE THE CUSTOMERS HAPPY. THIS WAS POSSIBLE BECAUSE OF HARD WORK, SINCERITY, CREATIVITY AND POSITIVE APPROACH. HE JOINED BANK AS A CLERK AND ELEVATED TO THE POST OF EXECUTIVE IN TOP MANAGEMENT. THIS SUCCESS STORY WILL INSPIRE THE READERS FOR BETTERMENT OF LIFE. HE LIKED TO MEET IDOLS LIKE KRANTISINH NANA PATIL, KARMAVIR BHAURAO PATIL, ACHARYA ATRE, P.L. DESHPANDE. HE MOBILISED DEPOSIT FOR THE BANK FROM DNYANPITH AWARD PRIZE RECEIVED BY V.S. KHANDEKAR HE LEARNT MANAGEMENT WITHOUT DOING MBA. HIS PARTICIPATION IN GANESHOTSAVA, SCOAT, NCC, STUDENT ORGANISATION, EARTHQUAKE RELIEF FUND, SWAMI VIVEKANAND SMARAK SAMITY, COLLEGE ANNUAL SOCIAL, MADE HIM MANAGEMENT EXPERT. HE ACTED IN 15 DRAMAS, PERFORMED CULTURAL PROGRAMMES ALONGWITH WIFE GEETA. DELIVERED MORE THAN 2000 LECTURES ON MANAGEMENT AND LITERATURE. HE SUCCESSFULY COMPLETED TRECK IN HIMALAYA. THE BOOK BOOK IS FULL OF INTERESTING STORIES FROM HIS LIFE. IT ENCOURAGES THE READERS TO ENRICH THE LIFE. IT SHOWS THE WAY TOWARDS HAPPY LIFE.
Brand
SHYAM BHURKE
Birth Date : 06/11/1946
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि., पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. अ. भा. सांस्कृतिक संघ, कथाभारती, डीएसके फाउंडेशन या संस्थांवर कार्याध्यक्ष आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धक समितीचे सदस्य आहेत. आत्तापर्यंत विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणीवरून नभोनाट्ये सादर झाली. प्रसिद्ध नियतकालिकांमधून अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. नाटकांमधून भूमिकाही केल्या. काही विषयांवर त्यांच्या ध्वनिफितीही प्रकाशित झाल्या आहेत. पत्नी गीता भुर्के यांच्यासह विशेष लेखन व कार्यक्रमही सादर केले. देश-परदेशांत तीन हजारांवर टॉक-शो केले आहेत. योगाभ्यास, मनाची कार्यशाळा, गिर्यारोहण, साहित्य संमेलनांमधून सक्रिय सहभाग.
Reviews
There are no reviews yet.