AMACHYA ITIHASACHA SHODH ANI BODH – आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध
₹100.00
Product Highlights
“डॉ. जयसिंगराव पवार यांनी अनेक इतिहास परिषदांच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणांचा हा लेखसंग्रह…. यामध्ये…….. महाराष्ट्रातील गेल्या शेसव्वाशे वर्षांतील इतिहास- संशोधन परंपरेचा शोध तर घेतला गेला आहेच, शिवाय ही परंपरा अधिक गतिमान कशी होईल, त्यासाठी इतिहासप्रेमींनी व अभ्यासकांनी काय करायला हवे, याचे दिग्दर्शन केले आहे…. इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती कशी असते?…. सामाजिक इतिहासाचे महत्त्व काय?…. स्थानीय इतिहासाचे राष्ट्रीय इतिहासात स्थान काय?… ऐतिहासिक वस्तू व वास्तू यांच्या अक्षम्य उपेक्षेची कारणमीमांसा काय?…. आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण काय करावयास हवे?…. इतिहासाचे शिक्षक इतिहासप्रेमी यांची यां संदर्भातील नेमकी कोणती जबाबदारी आहे?…. अशा अनेक प्रश्नांची चर्चा डॉ. पवार या लेखांतून करतात…. त्यातून महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी इतिहास संशोधनाकडे आकृष्ट होतील अशी आशा आहे. … “
Description
“THIS IS A COMPILATION OF MANY OF DR. JAISINGRAO PAWAR’S SPEECHES WHILE CHAIRING VARIOUS HISTORY CONFERENCES. THROUGH THESE SPEECHES HE HAS TAKEN AN OVERALL REVIEW OF RESEARCH RELATED TO HISTORY OVER THE LAST CENTURY. HE HAS ALSO DIRECTED MANY VIEWS SO AS TO SPEED UP THE PROCESS OF RESEARCH. THIS WILL SURELY ENABLE MANY SCHOLARS AND RESEARCH PERSONNEL. WHAT IS THE NATURE AND SCOPE OF HISTORY…? WHAT IS THE IMPORTANCE OF SOCIAL HISTORY…? WHAT IS THE IMPORTANCE OF REGIONAL HISTORY IN NATIONAL HISTORY…? WHAT IS THE CAUSE BEHIND COMPLETE IGNORANCE TOWARDS THINGS AND ARCHITECT WHICH IS ACTUALLY VERY IMPORTANT FROM THE HISTORICAL POINT OF VIEW…? WHAT SHOULD WE DO TO PRESERVE OUR HISTORICAL HERITAGE…? WHAT IS THE EXACT RESPONSIBILITY OF RESEARCHERS, PROFESSORS AND TEACHERS OF HISTORY…? DR. PAWAR DISCUSSES MANY SUCH ASPECTS THROUGH THIS COMPILATION. MANY OF THE MAHARASHTRIAN HISTORIANS WILL GET MOTIVATED FOR FURTHER RESEARCH. “
Brand
DR.JAYSINGRAO PAWAR
Birth Date : 30/12/1935
डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एवूÂण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक – सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Reviews
There are no reviews yet.