ADAM – ॲडम
₹350.00
Product Highlights
अॅडम`चा नायक वरदचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बऱ्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही `श्यामले`ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकराशी संबंध ठेवून वरदाचे जिने उद्ध्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या `प्रेमा`ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या `निर्मले`कडून किंचित्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
Description
VARAD, THE MAIN CHARACTER OF ADAM. THIS BOOK REVEALS HIS JOURNEY THROUGHOUT THIS LIFE. IN A WAY, IT IS ALMOST SIMILAR TO ANY MAN’S JOURNEY, THOUGHTS, ACTS AND BELIEFS. THIS NOVEL IS IN A WAY THE GRAPH OF HIS COMPLETE LIFECYCLE, RIGHT FROM THE BEGINNING. AT HIS YOUNG TENDER AGE HE IS VERY MUCH CURIOUS ABOUT THE OTHER GENDER, BUT HIS CURIOUSITY IS NEVER SATISFIED IN A PROPER WAY. WHEN HE ATTAINS MATURITY, HE IS RUTHLESSLY USED BY GROWN UP YET UNSATISFIED FEMALES. HE HIMSELF FALLS IN LOVE WHEREAS SHYAMALA MARRIES HIM NOT FOR LOVE BUT JUST FOR CONVENIENCE. LATER, SHE REMARRIES WITH HER OWN FIRST LOVE. THIS LEAVES VARAD IN A VERY SAD STATE OF MIND. HIS SHATTERED MIND TURNS TO PREMA. HE GIVES UNCONDITIONAL SHELTER TO PREMA AND HER CHILDREN WHO LATER ASKS HIM FOR HER SHARE IN HIS PROPERTY. LASTLY, HE SEEMS TO FIND SOLACE IN NIRMALA’S COMPANY. BUT THIS DOES NOT CONTINUE FOR TOO LONG. ONCE AGAIN, VARAD IS LEFT ALL ALONE IN THIS WORLD, LOVELESS…………
Brand
RATNAKAR MATKARI
Birth Date : 17/11/1938
Death Date : 17/05/2020
रत्नाकर मतकरी यांची १६ फेब्रुवारी, १९५५ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून वेडी माणसं ही एकांकिका प्रथम प्रसारित झाली. तेव्हापासून आजपर्यंत, पन्नास वर्षांहून अधिक काळ, त्यांची समृद्ध कारकिर्द बहरतेच आहे. साहित्य, रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या विविध माध्यमांतून त्यांनी लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून काम केले आहे. नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, कादंबरी, ललितलेख अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले आहे. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य आणि संगीत यांची संकल्पना, वेषभूषा रेखाटन आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपली कामगिरी अत्यंत निष्ठेने बजावली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी बालनाट्य,सूत्रधार आणि महाद्वार अशा तीन नाट्यसंस्था सुरू केल्या. प्रयोगशीलता, निर्मितीची अथक ऊर्जा, चैतन्य, उपक्रमशीलता; तसेच अंतर्मुखता आणि समाजाभिमुखता यांचे संतुलन हे रत्नाकर मतकरींच्या कलावंत-व्यक्तिमत्त्वाचे खास पैलू आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, 2019-20
Reviews
There are no reviews yet.