AAPAN SARE ARJUN – आपण सारे अर्जुन
₹130.00
Product Highlights
संसार घरच इतका अवघड आहे का? माणसाला नेमकं काय हवय? संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का? एखाद्या मैफिलीसारख रंगवता येणार नाही का? आपल्या जल्मापूर्वी हे जग होतच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हातरी होते आणि एक्झिट हि. हे नाटक किती वर्षाचं, ते माहित नाही चाळीसी, पन्नाशी, साठी, सत्तरी…. सगळं अज्ञात. धडधाकट भूमिका मिळणार कि जन्मांधळेपणा, अपंगत्व, बुद्धीच वरदान लाभणार, कि मतिमंद? भूमिकाही माहीत नाही. तरी माणसाचा गर्व,दंभ,लालसा…. किती सांगाव? कृष्णानं बासरीसहित आपल्याला चढवलं; पण त्या सहा छिद्रातून संगीत जन्माला येत नाही. स्वतःला काहीहि कमी नाही. स्वास्थाला धक्का लागलेला नाही. तरी माणस संसार सजवू शकत नाहीत.
Description
ARJUN, THE THIRD AMONGST THE PANDAVAS, STANDS FOR HIS SKILL OF ARCHERY AND IS CONSIDERED AS ONE OF THE GREATEST WARRIORS. THE DISTINGUISHED FIGHTER, HOWEVER, FELT CONFUSED WHEN THE FAMOUS MAHABHARAT WAR WAS ABOUT TO BEGIN ON THE BATTLEFIELD OF KURUKSHETRA. HE TURNED TO HIS CHARIOTEER, LORD KRISHNA, FOR ENLIGHTENMENT. THE LORD CLEARED ALL HIS DOUBTS THROUGH THE MOST INSTRUCTIVE AND INTERESTING DISCOURSES THAT CAME TO BE KNOWN AS THE BHAGVAD GITA. THE AUTHOR BELIEVES THAT IN THE PRESENT TIMES OUR POSITION IS NO BETTER THAN ARJUN. WE FACE VARIOUS PROBLEMS IN DAY TO DAY LIFE AND LIKE ARJUN CAN NOT MAKE UP OUR MINDS ON HOW TO SOLVE THEM. IGNORANCE, MISRULE, CORRUPTION, DOUBLE STANDARDS AND MANY SUCH FACTORS MAKE OUR MUNDANE LIFE DIFFICULT. THE AUTHOR DRAWS UP PARALLEL EXAMPLES FROM THE MAHABHARATA AND ATTEMPTS TO OFFER SOLUTIONS. THE TREATMENT OF THE THEMES IN THE ESSAYS IS LIKE THAT OF ART BUCHWALD WHOSE HUMOUR MAKES ONE SMILE AND BE SERIOUS AT THE SAME TIME.
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..
Reviews
There are no reviews yet.