Description
HE FOUND HER TO BE LIKE THE FIRST FOOTSTEPS OF THE FIRST SPRING AT THE BEGINNING OF THE ERA ON THIS EARTH. HE HEARD HER HEART BEATS, WHICH STARTED THE FIRST, THE “AADI` TAAL. SINCE THEN IT HAS BEEN CONTINUOUSLY BEATING ON ALONG WITH THE TIME, FOR ERAS IT IS IN HARMONY WITH THE ETERNAL TIME PRODUCING ITS “DHIN TIK`. THIS GAVE BIRTH TO THE RHYTHM ON THE EARTH. HE THOUGHT THAT HE HAS FOUND `AADITAAL`.
Brand
ANAND YADAV
Birth Date : 30/11/1935
Death Date : 27/11/2016
साहित्य अकादमी पुरस्कार, गिरणागौरव पुरस्कार नाशिक, सन्मानित साहित्यिक कालीमाता साहित्य पुरस्कार, परिमल लेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राज्य पुरस्कार, रोहमारे ग्रामीण पुरस्कार, रा. ना. सबनीस वाङ्मय पुरस्कार. आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ साली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. ग्रामीण साहित्यविषयक चळवळीला त्यांनी १९७४ पासून प्रारंभ केला. केवळ विनोद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण पात्रांच्या आयुष्यातील व्यथा, वेदना, त्यांची भीषण सुखदु:ख त्यांनी जगासमोर मांडली. १९८०पासून आजतागायत अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. साहित्यक्षेत्राशी संबंधित अनेक मंडळे, समित्या यांचे ते सदस्य आहेत. त्यांनी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांत त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुरस्कार मिळाले आहेत. आनंद यादव यांच्या अनेक साहित्यकृतींचे हिंदी, बंगाली, उर्दू, कन्नड, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक येथील मराठी विषय असलेल्या विद्यापीठांतून त्यांच्या पुस्तकांचा साहित्यकृतींचा, अभ्यास सातत्याने केला जातो. तसेच क्रमिक, पाठ्यपुस्तकांतूनही त्यांच्या विविध साहित्यकृतींचा सातत्याने समावेश केला जातो. झोंबी हे त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय झाले आहे. या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार व राज्य पुरस्कार यांच्यासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.