A TO Z VIDNYAN – ए टु झेड विज्ञान
₹95.00
Product Highlights
रोजच्या व्यवहारात विज्ञानातील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्याथ्र्यांच्या अभ्यासक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु त्यांंचे अर्थ कित्येकदा माहीत नसतात. त्यासाठीच ‘ए टु झेड विज्ञान’ची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात इंग्रजी ‘A’ या आद्याक्षरापासून झेड’ पर्यंत जास्तीत जास्त शब्दांची आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढून समजण्यास सोपी अशी मांडणी केली आहे. वैज्ञानिक खेळण्यांची, प्रयोगांची मनोरंजक पुस्तके देणाNया डी. एस्. इटोकर यांचे हे वेगळे पुस्तक बाल, कुमार वाचकांबरोबर आबालवृद्धांनाही आवडेल असा विश्वास वाटतो.
Description
IN DAY-TO-DAY LIFE, WE COME ACROSS MANY WORDS AND DEFINITIONS. THE STUDENTS LEARN MANY THEOREMS AND OBSERVE MANY APPARATUS IN THEIR SCHOOLS. BUT, IF WE GIVE IT A SERIOUS THOUGHT THEN WE WILL REALIZE THAT MANY OF THEM ARE NOT FULLY AWARE OF THE MEANINGS OF THIS NAMES, DEFINITIONS OR APPARATUS. THE WHOLE PURPOSE BEHIND THE PUBLICATION OF THE BOOK “A TO Z` WAS TO HELP EVERYONE TO OVERCOME THIS DIFFICULTY. IN THIS BOOK, WE HAVE STARTED WITH THE MEANINGS AND EXPLANATIONS OF WORDS IN AN ALPHABETICAL ORDER. WE HAVE TRIED TO MAKE IT EASIER BY DRAWING FIGURES WHEREVER NECESSARY. THE AUTHOR HAS SO FAR WRITTEN DIFFERENT BOOKS ABOUT THE SCIENTIFIC TOYS, AND EXPERIMENTS. WE ARE SURE THAT THE READERS WILL ENJOY THIS BOOK AS WELL.
Brand
D.S.ITOKAR
Birth Date : 23/09/1945
डी.एस. इटोकर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या गावी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. चित्रकला, कार्यानुभव, कळसूत्री बाहुली नाट्य, पटकथा लेखन, कृती संशोधन अशा वेगवेगळ्या विषयांत त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या लोकसंख्या शिक्षण उपकरण आणि वैज्ञानिक उपकरण यांना जिल्हा आणि राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रभावी चित्रकला अध्यापन, विज्ञान उपकरणांची निर्मिती, शैक्षणिक साधनांचे अध्यापनात महत्त्व अशा विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. जीवन-शिक्षण , शिक्षण संक्रमण , विज्ञान युग , प्रगत विज्ञान अशा विविध मासिकांमधून इटोकर यांनी लोकसंख्या शिक्षण, समाजोपयोगी उत्पादक कार्य, विज्ञान, चित्रकला, कार्यानुभव या विषयांवर भरपूर लिखाण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक राज्य पुरस्काराबरोबरच इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आपल्या आसपास सहज मिळणाऱ्या वस्तू वापरून खेळणी तयार करता करता लहान मुलांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांच्यातील सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढेल, अशी त्यांना खात्री आहे. हा दृष्टिकोन बाळगूनच त्यांनी वैज्ञानिक खेळणी, छंदातून विज्ञान, खेळणीच खेळणी ह्या पुस्तकांची निर्मिती केली.
Reviews
There are no reviews yet.