Description
“A NOTE FROM ICHIYO” TELLS THE TURBULENT LIFE, STRUGGLES AND ACHIEVEMENTS OF ICHIYO HIGUCHI, A YOUNG JAPANESE FEMALE WRITER OF EXTRAORDINARY TALENT AND THE TONGUE IN CHEEK ABILITY TO EFFORTLESSLY CUT THROUGH ALL THE RIGID CONSTRAINTS OF BEING A WOMAN IN A MAN’S WORLD WHO ENDED UP HAVING THE WORLD, INCLUDING SOME OF THE MOST PROMINENT MALE WRITERS, AT HER FEET — GRUDGINGLY SO BUT STILL AT HER FEET!
Brand
REI KIMURA
Birth Date : 23/09/1962
रेई किमुरा या व्यवसायाने वकील आहेत, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन न्यूज सिंडिकेटच्या अधिकृत फ्री लान्सर जर्नलिस्टही आहेत; परंतु वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि व्यक्तिमत्त्वांच्या रेखाटनाची त्यांना नैसर्गिक ओढ असल्याने त्यांचे लेखनही वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सत्यावर आधारित घटनांना आपल्या कल्पनाशक्तीने त्या सहजपणे कथारूप देतात. आजपर्यंत त्यांच्या बटरफ्लाय इन द विंड , जॅपनीज रोझ , जॅपनीज ऑर्किड , आवा मारू – टायटॅनिक ऑफ जपान , माय नेम इज एरिक अशा अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच यांतील अनेक कादंबऱ्याचे आतापर्यंत अनेक आशियाई आणि युरोपीयन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांचे बरेचसे लेखन ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे. ऐतिहासिक काळातल्या अनेक वास्तव घटना, प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वांना त्या आपल्या लेखणीतून जिवंत करतात; परंतु तरीही त्यांचे लेखन केवळ ऐतिहासिक घटना-प्रसंगांपुरते मर्यादित नाही. त्यांनी आपल्या AUM SHINRIKYO-JAPAN S UNHOLY SECT या कादंबरीत १९९५ मध्ये टोकियो सब-वेवर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला आणि त्यातील विदारकता यांचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. तसेच आपल्या खेळकर शैलीत माय नेम इज एरिक या कादंबरीमधून खट्याळ आणि धमाल उडवणाऱ्या कुत्र्याबद्दलही लिहिलेले आहे. अशा प्रकारे आपल्या लेखनातून त्यांनी विविध प्रकारचे विषय हाताळलेले दिसतात. सामाजिक दृष्टीने संवेदनशील विषयही त्या समर्थपणे पेलताना दिसतात. सातत्याने सत्याचा शोध घेणारे, आव्हानांना सामोरे जाणारे आणि पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणारे असे आपले लेखन असावेत, यावर किमुरा यांची श्रद्धा आहे.

Reviews
There are no reviews yet.