A CALL TO HONOUR – ए कॉल टू ऑनर
₹450.00
Product Highlights
भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात श्री. जसवंतसिंग यांनी आपल्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला. विशेषत: अणुचाचण्या केल्यावर जो जागतिक गदारोळ भारताविरुद्ध झाला, तो त्यांनी शमवला. इतकेच नव्हे, तर विरुद्ध गेलेल्या अमेरिकेला भारताच्या बाजूने वळवून दाखवले. या पुस्तकात त्याची रोमहर्षक कहाणी आहे. शिवाय पाकिस्तानची निर्मिती, अणुबाँब आणि पाकिस्तानी अस्मिता, चिनी आक्रमणाच्या १२ वर्षे आधी सरदार पटेल यांनी नेहरूंना दिलेला इशारा, मुशर्रफ यांच्या गुप्त खलबतांचे ध्वनिमुद्रण, पळवलेल्या भारतीय विमानाची सुटकेमागची परिस्थिती, कारगिल युद्ध, संसदेच्या इमारतीवरील हल्ला, ‘भारताचे संरक्षण-धोके व जाणिवा’ अशा अनेक बाबतीत अद्याप प्रकाशात न आलेली माहिती जसवंतसिंग यांनी या पुस्तकात दिली आहे. एक वैचारिक पण थरारक, राजकीय पण खिळवून ठेवणारे पुस्तक!
Description
JASWANTSINGH`S UNIQUENESS WAS IMPRINTED DURING THE REIGN OF BHARATIYA JANATA PARTY`S RASHTRIYA LOKSHAHI AGHADI. THE MOST PROMINENT OF HIS WORK WAS THE WAY HE HANDLED THE CHAOS AFTER THE NUCLEAR PROGRAM AND TESTS CONDUCTED UNDER IT. NOT ONLY THIS, HE SUCCEEDED IN MAKING AMERICA UNDERSTAND INDIA`S STAND ON THE NUCLEAR FRONTS. THIS BOOK CASTS A LIGHT ON THIS VERY FACT.THIS BOOK ALSO INCLUDES VARIOUS SENSITIVE MATTERS WHICH WERE NOT BROUGHT INTO OPEN TILL TODAY, SUCH AS FORMATION OF PAKISTAN, NUCLEAR BOMB, SARDAR VALLBHBHAI PATEL`S WARNING TO PANDIT NEHRU 12 YEARS PRIOR TO THE ATTACK FROM CHINA, THE RECORDING OF MUSHARRAF`S SECRET PLANS, THE REAL SITUATION BEHIND THE RESCUE OF THE HIJACKED INDIAN AEROPLANE, KARGIL WAR, THE ATTACK ON THE PARLIAMENT, INDIA`S PROTECTION, THE DANGERS AND THE COGNIZANCE, ETC. THOUGH BASED ON POLITICS; THIS BOOK IS REALLY A VERY THRILLING ONE.
Brand
JASWANT SINGH
Birth Date : 03/01/1938
राजस्थानातील जेसल या गावी एका राजपूत कुटुंबात जसवंत सिंग यांचा जन्म झाला. त्यांची राजकीय कारकिर्द १९८०मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभा सदस्य म्हणून सुरू झाली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारात त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री ही पदे निभावली. राजकीय क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. बुद्धिबळ, गोल्फ आणि पोलो हे त्यांच्या आवडीचे खेळ आहेत. राजस्थानातील प्राचीन डिंगल या भाषेच्या उत्थानासाठी ते प्रत्यत्नशील आहेत. राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रांतील जीवनप्रवासात आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी ए कॉल टू ऑनर हे पुस्तक लिहिले आहे.
Reviews
There are no reviews yet.