MY FAMILY IS ALL I HAVE – माय फॅमिली इज ऑल आय हॅव
₹220.00
Product Highlights
ही सत्यकथा आहे एका ब्रिटिश स्त्रीची! ती पूर्व युरोपात तब्बल पन्नास वर्षं अडकून पडली. पहिल्यांदा नाझींच्या दृष्टचक्रात आणि मग साम्यवादाच्या विळख्यात! पण तिनं स्वत:च्या घरी परत जाण्याचं स्वप्न उराशी घट्ट कवटाळून ठेवलं. १९३७ मध्ये कौटुंबिक सहल म्हणून लंडनहून बल्गेरियाला निघालेली हेलन फक्त पंधरा वर्षांची होती. तिथे पोहोचली आणि काळाचं चक्र निराळ्याच गतीनं फिरू लागलं. परिस्थिती गंभीर बनली. बल्गेरियातून बाहेर पडणं मुश्किल झालं. रोजचं जगणंही कठीण बनलं होतं. तिला बल्गेरिअन माणसाशी लग्न करणं भाग पडलं. त्याच्यापासून हेलनला चार मुलं झाली. भुकेल्या, थंडीनं गठाळलेल्या मुलांबरोबर सतत आसरा शोधत फिरणं नशिबी आलं. समोर कष्टांचा डोंगरच होता. हेलननं मात्र धीर सोडला नाही. परिस्थितीच्या तडाख्यांना तोंड देत तिनं मुलांना वाढवलं. १९८९ मध्ये बर्लिनची भिंत पडली. स्वगृही जाण्याचं हेलनचं स्वप्न पुरं होण्याची वेळ जवळ आली होती. तिनं लिहिलेल्या आठवणी हृदयद्रावक आहेत… पण ही गोष्ट आहे तिच्या धीराची, आशावादाची आणि पराभव अमान्य करणा-या तिच्या कणखर मनाची!
Description
THE EXTRAORDINARY TRUE STORY OF HOW ONE BRITISH WOMEN WAS TRAPPED IN EASTERN EUROPE FOR FIFTY YEARS, FIRST BY THE NAZIS AND THEN BY COMMUNISM, BUT NEVER STOPPED TRYING TO GET BACK HOME…HELEN-ALICE DEAR WAS ONLY FIFTEEN WHEN SHE LEFT LONDON TO VISIT BULGARIA ON A FAMILY HOLIDAY IN 1937- JUST WEEKS AFTER HER ARRIVAL, SHE FOUND HERSELF UNABLE TO LEAVE AND STRUGGLING TO SURVIVE IN AN INCREASINGLY HOSTILE AND TERRIFYING ENVIRONMENT. HER MARRIAGE TO A BULGARIAN MAN BORE HER FOUR CHILDREN BUT THEY WERE OFTEN HOMELESS, COLD AND HUNGRY. DESPITE THESE HARDSHIPS, HELEN REFUSED TO GIVE UP HOPE AND BRAVELY MANAGED TO PROTECT AND RAISE FOUR HAPPY CHILDREN. WHEN THE BERLIN WALL FELL IN 1989, HELEN WAS FINALLY ABLE TO FULFILL HER DREAM OF RETURNING TO HER HOMELAND. HER BEAUTIFULLY WRITTEN MEMOIR IS A HEART-WRENCHING TALE OF COURAGE AND RESILIENCE, PROVING JUST HOW INDOMITABLE THE HUMAN SPIRIT CAN BE.
Reviews
There are no reviews yet.