WILLA CATHER
-
DEVACHI MANSE – देवाची माणसे
Product Highlightsफादर लतूर आणि फादर जोसेफ व्हेलट यांच्या आयुष्यावर आधारित कादंबरी आहे ‘देवाची माणसे.’ न्यू मॅक्सिको इथं खिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मुख्य…
Birth Date : 07/12/1873
Death Date : 24/04/1947
विला कॅथर यांचा जन्म , व्हर्जिनियातील बॅक क्रीक व्हॅली इथं झाला.1890 साली त्यांनी रेड क्लाऊड हायस्कूल येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. कॅथर यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण नेब्रास्का विद्यापीठात शिक्षण घेत असताना कॅथर यांच्यामध्ये लेखनाची आवड रूजली. 1892 साली बोस्टन मासिकात त्यांची लघुकथा प्रसिद्ध झाली. जी पुढे त्यांच्या माय अॅन्टोनिया या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. पदवी शिक्षणानंतर त्यांनी होम मंथली मासिकात संपादनाची धुरा सांभाळली. या मासिकात मजकूर वाढवण्यासाठी कॅथर यांनी विपुल लघुकथालेखन केलं. ज्या कथा द ट्रोल गार्डन या कथासंग्रहात प्रसिद्ध झाल्या. 1913 साली त्यांची ओ पायोनियर्स तर 1917 साली माय अॅन्टोनिया कादंबरी प्रसिद्ध झाली. द लॉस्ट लेडी या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना 1923 साली पुलित्जर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळच्या त्यांच्या लेखनाचा गाभा स्थलांतर आणि परंपरागत राहणीमानाचा विनाश या विषयांशी जोडलेला होता. या घवघवीत यशानंतर कॅथर यांच्या 1925 साली द प्रोफेसर्स हाउस, 1926 साली माय मॉर्टल एनीमी आणि 1927 साली डेथ कम्स फॉर आर्चबिशप या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. विला कॅथर यांच्या संपूर्ण साहित्यातून कला, इतिहास आणि धर्मविषयक जाणिवांचं सखोल चिंतन प्रकट होतं.