VIKTOR E. FRANKL
-
ARTHACHYA SHODHAT – अर्थाच्या शोधात
Product Highlightsदररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या , तुमचे मनोबल…
Birth Date : 26/03/1905
Death Date : 02/09/1997
डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल हे ऑस्ट्रियातील प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट व सायकिअॅट्रिस्ट होते. १९४० ते १९४२, रॉथशिल्ड हॉस्पिटल येथे त्यांनी न्यूरॉलॉजी विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी ऑशवित्झ आणि इतर काही यातनातळांवर तीन वर्षे घालवली. १९४६पासून १९७०पर्यंत ते व्हिएन्ना न्यूरॉलॉजिकल पॉलिक्लिनिक येथे मुख्य अधिकारी होते. हार्वर्ड येथे आणि पिट्सबर्ग, सॅन दिएगो आणि डॅलास या विद्यापीठात ते अतिथी प्राध्यापक होते. यु.एस. आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांच्यासाठी लोगोथेरपी हा स्वतंत्र विभाग तयार केला. जगभरातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना २९ डॉक्टरेट्स देऊन सन्मानित करण्यात आले आहे.द अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशन यांनी डॉ. फ्रॅन्कल यांना ऑस्कर फिस्टर पुरस्कार बहाल केला. फ्रॅन्कल यांची आतापर्यंत एकूण ३२ पुस्तके ३४ भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. जगातील पाचही खंडांमध्ये मिळून एकूण २०९ विद्यापीठांमध्ये त्यांनी व्याख्याने दिली आहेत. द अमेरिकन जर्नल ऑफ सायकिअॅट्रीच्या मताप्रमाणे, डॉ. फ्रॅन्कल यांचे कार्य म्हणजे फ्रॉइड आणि अॅडलरनंतरचे सर्वांत अर्थपूर्ण विचार आहेत. ऑस्ट्रियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. १९९५ साली व्हिक्टर फ्रॅन्कल यांना त्यांचे जन्मस्थळ व्हिएन्ना येथील सन्माननीय नागरिकत्व प्राप्त झाले.