VIJAYA RAJADYAKSHA
Birth Date : 05/08/1933
विजयाबार्इंचे शिक्षण एम.ए., पीएच.डी. झाले. त्यांनी एाQल्फन्स्टन महाविद्यालयात आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच एम.फिल. व पीएच.डी.च्या अनेक विद्याथ्र्यांना यशस्वी मार्गदर्शन केले. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते. त्यांचे १८ कथासंग्रह, ५ ललित लेखसंग्रह आणि ७ समीक्षाग्रंथ तसेच अनेक संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विजयाबार्इंची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते आणि तरल, काव्यात्म शैलीने अशी कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार तर कवितारती या समीक्षा लेखसंग्रहास रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक व राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ समीक्षाग्रंथास साहित्य अकादमीचा आणि कै. केशवराव कोठावळे पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सचिव पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अध्यापक गौरव पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा साहित्यरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इंदूर येथे २००१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. इतर विविध संस्थांवरही त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला तसेच सूत्रसंचालन केले. शाळा व महाविद्यालयांसाठी पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ज्ञानपीठ पारितोषिक परीक्षक समिती, चित्रपट परीक्षण मंडळ, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाप्रमाणेच अन्य अनेक संस्थांच्या त्या सदस्य होत्या. त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी होत्या. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराच्या सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार-२०१९
-
AKHERACHE PARV – अखेरचे पर्व
Product Highlightsविजयाताईंच्या ’अखेरचे पर्व’ या कथासंग्रहात पूर्वप्रकाशित बारा कथांचा अंतर्भाव आहे. त्या त्या दिवाळी अंकाचा स्वभाव किंवा अभिरुचीनुसार या लिहिल्या असल्या… -
AVATI BHAVATI – अवती भवती
Product Highlights‘अवती भवती’ हा ख्यातनाम संवेदनशील लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ललित लेखसंग्रह आहे. विजयाबार्इंची कथा/लेख… -
UTTARARDH – उत्तरार्ध
Product Highlights‘उत्तरार्ध’ हा विजया राजाध्यक्ष यांच्या पूर्वप्रकाशित वाचनीय कथांचा संग्रह. यात त्यांच्या एकूण चौदा कथांचा अंतर्भाव आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात येणारं अटळ…