UMESH KADAM
-
SANHAR – संहार
Product Highlightsजर्मनीमध्ये दुसर्या महायुद्धादरम्यान लक्षावधी निरपराध ’ज्यू’ वंशाच्या लोकांचा आणि युद्ध कैद्यांचा अनन्वित छळ केला गेला. त्यापैकी बहुतांशी लोकांची हत्या करण्यात…
Birth Date : 26/03/1956
प्रा. डॉ. उमेश कदम यांचे शालेय शिक्षण बार्शी, जयसिंगपूर व कोल्हापूर येथे, तर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उच्च शिक्षण व प्रशिक्षण इंग्लंड (लंडन विद्यापीठ), हॉलंड, स्वित्झर्लंड व ग्रीस येथे झाले. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांना राष्ट्रकूल शिष्यवृत्ती मिळाली होती. १९८०पासून १९९८पर्यंत त्यांनी या विषयाचे अध्यापन केले. १९९८मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस च्या दक्षिण आशिया विभागाचे कायदा सल्लागार म्हणून दिल्ली येथील विभागीय कार्यालयात निवड झाली. २००४ ते २००८पर्यंत आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसच्या मलेशिया येथील क्वालालंपूरच्या विभागीय कार्यालयात पूर्वेकडील पंधरा राष्ट्रांचे वरिष्ठ कायदा सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. यासंबंधी ते पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया येथे कार्यरत होते. प्रा. उमेश कदम यांचे वडील सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबा कदम यांच्याकडून त्यांनी लिखाणाची प्रेरणा घेतली. लेखनाव्यतिरिक्त त्यांना चित्रकला, शिल्पकला व पाककला यांमध्येही रस आहे.