TUSHAR GANDHI
-
LETS KILL GANDHI ! – लेट्स किल गांधी !
Product Highlights३० जानेवारी १९४८ रोजी, नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचे पितामह महात्मा गांधी यांचा एका हिंदू अतिरेक्याने वध केला़ त्यानंतरच्या काळात अनेक…
तुषार अरुण गांधी (जन्म:१७ जानेवारी, १९६० मुंबई येथे) हे महात्मा गांधींचे पणतू आणि पत्रकार अरुण गांधी यांचे सुपुत्र आहेत़ मुंबई आणि कोलकाता याच्या दरम्यान गाडीतच त्यांचा जन्म झाला़ त्यांचे बालपण सांताक्रूझमध्ये गेले. मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली़ १९९६ मध्ये कटक येथील बँक ऑफ इंडियाच्या तिजोरी मध्ये चुकून राहिलेला महात्मा गांधींचा रक्षाकलश सापडला़ सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने त्यांनी या कलशाचे त्रिवेणीसंगमात ३० जानेवारी १९९७ रोजी विसर्जन केले़ त्याच वर्षी त्यांनी महात्मा गांधी प्रतिष्ठानची स्थापना केली. ते या प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आहेत़ लेट्स किल गांधी या पुस्तकात त्यांनी महात्माजींच्या वधासाठी ब्राह्मणांना दोष दिला़ टीकाकारांच्या मते या पुस्तकामुळे सर्वच ब्राह्मणांची बदनामी झाली आहे़ तुषार गांधी मात्र ठामपणे म्हणतात, की त्यांनी केलेले दोषारोप सर्व ब्राह्मणांना नव्हे, तर केवळ सतत माझ्या पणजोबांच्या जिवावर उठलेल्या पुण्यातील ब्राह्मणांच्या एका विशिष्ट गटाला उद्देशून आहेत़ २००५ साली त्यांनी दांडीयात्रेच्या ७५ व्या स्मरणदिनी पुन्हा एकदा २४१ मैलांची दांडीयात्रा काढली़ त्यांच्याच प्रयत्नांमुळे दांडीयात्रेचा साबरमती ते दांडीचा हा मार्ग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा ठरवण्यात आला़ तुषार यांचे सध्या वास्तव्य मुंबई येथे पत्नी सोनल, मुलगा विवेन व मुलगी कस्तुरी यांच्या समवेत आहे.