TODD BURPO AND LYNN VINCENT
Birth Date : 05/08/1968
टॉड बर्पो हे नेब्रास्कातील इम्पीरिअल या गावी क्रॉसरोड्स वेस्लेयान चर्चचे धर्मोपदेशक आहेत. त्यांची प्रवचने तिथल्या रेडिओ केंद्रातून प्रत्येक रविवारी प्रक्षेपित केली जातात. ते चेस काउन्टी पाब्लीक स्कुलमध्ये लहान मुलं व हायस्कुल विद्यार्थी यांच्यासाठी कुस्तीचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. ते स्कुल बोर्डाचेही सदस्य आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी टॉड बर्पो, इम्पीरिअल व्हॉलेंटियर फायर डिपार्टमेंटच्या जवानांबरोबर स्वयंसेवक म्हणून खांद्याला खांदा लावून आगीशी झुंजताना दिसतात. नेब्रास्का स्टेट व्हॉलेंटियर फायर फायटर्स असोसिएशनचे ते चॅप्लीन (धार्मिक विधी करणारे) आहेत. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी टॉड ओव्हरहेड डोअर स्पेशालिस्ट ही कंपनी चालवतात. टॉडने ओक्लाहोमा वेस्लेयान युनिव्र्हिसटींची ब्रह्मज्ञान शास्त्रातील बी. ए. पदवी सुमा कम ल्यूड (SUMMA CUM LAUDE) म्हणजे उत्तम शैक्षणिक पात्रतेसाठी मिळणार्या शेर्यासह मिळविली आहे. त्यांना १९९४मध्ये दीक्षा दिली गेली.
-
SWARGACHA SAKSHATKAR – स्वर्गाचा साक्षात्कार
Product Highlightsटॉड बर्पो हे नेब्रास्कातील इम्पीरिअल या गावी क्रॉसरोड्स वेस्लेयान चर्चचे धर्मोपदेशक आहेत. ते चेस काउन्टी पब्लिक स्कूलमध्ये कुस्तीचे मार्गदर्शक व…