SHASHIKANT WAMAN KALE
-
MAGARDOHA – मगरडोह
Product Highlightsरहस्यं आणि मिथकांच्या चक्रव्यूहात बदलणारी मनोदैहिकता टिपणाऱ्या अकरा गूढकथांचा संग्रह म्हणजे मगरडोह होय. पुनर्जन्मावर आधारित पहिलीच कथा ‘घातचक्र’..पत्नीसह रेल्वेप्रवासाला निघालेल्या…
Birth Date : 17/04/1939
शशिकांत वामन काळे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते कथालेखन करत आहेत. विज्ञानकथा कथनाचे कार्यक्रम ते करतात. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या डहाणू शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. गूढकथा आणि विज्ञानकथांमध्ये त्यांना विशेष स्वारस्य आहे. ‘खेळ’, ‘वासांसि जीर्णानि’ हे विज्ञानकथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. तसेच माहिती-ज्ञान-मनोरंजनपर लेखही त्यांनी लिहिले आहेत.