SEEMA GOSWAMI
-
WOMAN ON TOP – वुमन ऑन टॉप
Product Highlights‘वुमन ऑन टॉप’ किताबाच्या मानकरी ठरण्यासाठी नोकरीच्या वाटचालीत शेवटी त्या आभासमय, अभेद्य अशा ग्लास सिलिंगला छेद देण्याची, ‘बॉस’ होऊन खास…
या कादंबरीकार व हिंदुस्थान टाइम्स च्या वरिष्ठ पत्रकार आहेत. टी.व्ही.च्या तसेच हिंदुस्थान टाइम्स च्या ब्रंच या संडे मॅगॅझिनमधील त्यांच्या स्पेक्टॅटर या स्तंभलेखनामुळे सुपरिचित आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात संडे या भारतातल्या बेस्ट सेलर साप्ताहिकामधून राजकीय पत्रकार म्हणून केली. वेगवेगळ्या सार्वत्रिक निवडणुकांचे रिपोर्टिंग करताना तत्कालिक दोन पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्याही मुलाखती घेतल्या होत्या. पत्रकार म्हणून काम करताना त्यांना जगभर प्रवासही करावा लागला. १९९५मध्ये ग्राफिटी या नावाने रविवारी प्रकाशित होणारी पुरवणी सुरू केली. जी त्यासारख्या प्रकाशित होणाऱ्या पुरवण्यांसाठी आदर्श ठरली. २००४पर्यंत संस्थापक संपादक म्हणून ग्राफिटी साठी त्यांनी काम केले. ही पुरवणी जीवनशैली आणि ऐषारामाच्या जीवनाविषयीची भारतातील पहिली पुरवणी ठरली. या संपादकीय कामात त्यांना असलेली फॅशन या विषयातील सर्व माहिती त्यांनी पणाला लावली आणि जगभर आपल्या लेखनकौशल्याने त्या सुप्रतिष्ठित झाल्या