SEBASTIAN FAULKS
-
DEVIL MAY CARE – डेव्हिल मे केअर
Product Highlights``ये, शून्य-शून्य-सात,`` एम. म्हणाला. ``तू परत आलेले बघून खूप बरे वाटले.`` ``मला गरज आहे तुझी शून्य-शून्य-सात. नीटशी माहिती नाही; पण…
Birth Date : 20/04/1953
सेबॅस्टिअन फॉक्स यांचा जन्म १९५३मध्ये झाला. वेलिंग्टन कॉलेज आणि इमॅन्युएल कॉलेज, केम्ब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून पेशा पत्करला. १९८४मध्ये वयाच्या ३१व्या वर्षी अ ट्रिक ऑफ लाइट ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर बर्डसाँग , ह्युमन ट्रेसेस , अ वीक इन डिसेंबर अशा अनेक कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. १९९४मध्ये फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर म्हणून त्यांची निवड झाली होती. दरवर्षी इंग्लंडचा राजा किंवा राणी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोच्च नागरी पुरस्कारां ची यादी जाहीर करण्यात येते. २००२मध्ये राणीच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आलेल्या यादीप्रमाणे सी.बी.ई. – कमांडर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. इयान फ्लेमिंग यांच्या इस्टेटीच्या ट्रस्टींनी विनंती केल्यावरून इयान फ्लेमिंग यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २८ मे, २००८ रोजी डेव्हिल मे केअर ही जेम्स बाँडची नवी कादंबरी प्रसिद्ध झाली. आपली पत्नी व्हेरोनिका आणि मुले विल्यम, हॉली आणि ऑर्थर यांच्यासह ते लंडनला राहातात.