सावित्री साव्हनी यांचा जन्म १९३८ मध्ये मेक्सिकोमध्ये झाला. १९५६ मध्ये जवळजवळ पन्नास वर्षांचा, परकीय भूमीवरचा वनवास संपवून, त्यांचे वडील पांडुरंग खानखोजे जेव्हा मायदेशी परतले, त्या वेळी साव्हनी भारतात आल्या. त्यांची बेल्जीयम आई जेनी ही सुद्धा त्यांच्याबरोबर भारतात आली. लेखिका बालरोगतज्ज्ञ असून, बहुभाषीदेखील आहेत. त्यांचे INDIA MEXICO : ENCOUNTERS AND SIMILARTIES हे पुस्तक मॅकमिलन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. दिल्लीमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. निवृत्त ब्रिगेडिअर व्ही. के. साव्हनी हे त्यांचे पती. त्यांची कन्या केमिकल इंजिनिअर असून, मुलगा भारतीय नौदलात कमांडर आहे.