SARAT CHANDRA CHATTOPADHYAY
-
DEVDAS – देवदास
Product Highlights‘देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी. ही त्यांची (१८७६-१९३८) लहान, पण गाजलेली कांदबरी.ह्या लहानशा कादंबरीतही शरदबाबूंची बहुतेक सर्व लेखन-वैशिष्ट्ये…
Birth Date : 15/09/1900
Death Date : 17/01/1938
शरच्चंद्र यांचे बालपण पश्चिम बंगालमधील देवानंदपूर येथे गेले. त्यानंतर १८८६मध्ये, ते आजोळी भागलपूर येथे राहायला गेले. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण देवानंदपूर आणि भागलपूर येथे झाले. बुद्धिमान विद्यार्थी असूनही त्यांना परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण पुरे करता येऊ शकले नाही. किशोर जीवनापासूनच त्यांचा साहित्याकडे ओढा होता. १९०१मध्ये संन्यासी म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी भ्रमण केले. या भ्रमणात त्यांनी बारकाईने समाज जीवनाचे निरीक्षण केले. त्याचेच दर्शन त्यांच्या साहित्यकृतीत आढळते. नशीब अजमावण्यासाठी, १९०३मध्ये ते ब्रह्मदेशात गेले. तेथे त्यांनी रेल्वे व डी.ए.जी. ऑफिसमध्ये नोकरी केल्यानंतर; १९१६मध्ये ते भारतात परतले. यमुना , भारतवर्ष अशा नियतकालिकांतून लेखन करू लागल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. १९२१मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेक साहित्यसभांचे आणि संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले, तसेच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. त्यांना कलकत्ता विश्वविद्यालयाने १९२३ साली जकत्त तपरीणी सुवर्णपदक दिले, तर १९३६ साली ढाका विश्वविद्यालयाची डी.लिट. पदवीही मिळाली. बंगाली, तसेच भारतीय साहित्यामध्ये शरच्चंद्र यांनी केलेले काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बंकिमचंद्र, रवींद्रनाथ आणि शरच्चंद्र हे तिघेही बंगाली साहित्याचे आधारस्तंभ मानले जातात. देवदास , श्रीकांत , बडो दीदी , बिराज व बऊ , चरित्रदिप , पथेर दाबी या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या, तर बिंदुर छेले , परिणिता , इशकृती , स्वामी या त्यांच्या कथा अविस्मरणीय ठरल्या. विजया , षोडशि , रमा या नाट्यकृती आणि तरुणेर , विद्रोह , स्वदेश , ओ , साहित्य , नारिर , मूल्य यासारखे लेख त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. शरच्चंद्रांनी तळागाळातील माणूस आणि समाजाने पतित ठरवलेल्या स्त्रिया यांना आपल्या साहित्यात मानाचे स्थान दिले आणि त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. प्रासादिक भाषा आणि अर्थगर्भ संवाद ही त्यांची बलस्थाने मानली जातात. त्यांचे साहित्य स्वानुभवाच्या मुशीतून जन्मलेले असल्यामुळे सजीव वाटते.