ROBERT CRAIS
-
THE WATCHMAN – द वॉचमन
Product Highlightsन्यूयॉर्क टाइम्सच्या मते जो पाईक - मरीन, भाडोत्री सैनिक, पोलीस आणि शेवटी एल्व्हिस कोल या खाजगी डिटेक्टिव्हचा व्यवसायातला भागीदार -…
Birth Date : 20/06/1953
रॉबर्ट क्रेस मूळचे मिसिसिपी नदीच्या काठावरील लुईझियाना राज्यातील बॅटन रूझचे. सर्व जण एक तर तेल शुद्धीकरण कारखान्यात काम करत, नाही तर पोलीसखात्यात भरती होत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी रेमन्ड शान्डलर यांचे द लिटल सिस्टर हे पुस्तक विकत घेऊन वाचले आणि आयुष्यभर आपल्याला काय करायचे आहे, ते ठरवून टाकले. १९८५मध्ये त्यांनी स्वत:च्या अनुभवांवरून एल्व्हिस कोल या नायकाची निर्मिती करून लिहिलेल्या द मन्कीज रेनकोट या कादंबरीला अॅन्थनी आणि मॅक्व्हीटी पुरस्कार प्राप्त झाला आणि एडगर अॅवॉर्डसाठीही नामांकन मिळाले. इन्डीपेन्डन्ट मिस्टरी बुकसेलर्स असोसिएशन च्या, शतकातल्या शंभर रहस्यमय कादंबऱ्यामध्ये या कादंबरीचा समावेश होता. एल्व्हिस कोल, जो पाईक यांच्यावर आधारित कादंबऱ्याव्यतिरिक्त त्यांनी इतरही कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी टेलिव्हिजनसाठी हिल स्ट्रीट ब्ल्यूज, कॅग्ने अँड लेसी, मायामी व्हाइस या मालिका आणि क्रॉस ऑफ फायर ही चार तासांची छोटी मालिका यांचे पटकथा लेखनही केले आहे. सध्या ते सान्ता मोनिका येथे आपली पत्नी, तीन मांजरे आणि हजारो पुस्तकांच्या सहवासात राहतात.