PRAMOD JOGLEKAR
-
ASE GHADALE SAHASTRAK – असे घडले सहस्रक
Product Highlightsह्या गं्रथात पिरॅमिड ते इ.स.२००० असा साधारण पाच हजार वर्षांचा मानवी प्रगतीचा पट आपल्यापुढं उलगडला जातो. साधारण पाच हजार वर्षे…
Birth Date : 17/07/1960
प्रमोद जोगळेकर पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये बायो-आर्किओलॉजीचे वरिष्ठ व्याख्याते आहेत. त्यांनी 1980मध्ये पुणे विद्यापीठातून झूलॉजीमधून पदवी संपादन केल्यानंतर याच विषयामध्ये 1982मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. 1986मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून स्टॅटिस्टिक्स (बायोमेट्री) या विषयामधून एम.फिल केले. याचवर्षी त्यांची सिव्हिल सर्व्हिसेससाठी निवड झाली. 1991मध्ये त्यांनी आर्किओलॉजीतून पीएच.डी केली. त्यानंतर 2001 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजीतून एम.ए.देखील केले. 1987पासून ते डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन तसेच अध्यापन करू लागले. 1991 सालापासून ते मॅन अॅन्ड इन्व्हायरमेंट या आंतरराष्ट्रीय जर्नलचे संयुक्त संपादक आहेत. त्यांना प्रोफेसर एच.डी. संकालिया यंग आर्किओलॉजिस्ट अॅवार्ड (1993), फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा बेस्ट पब्लिकेशन अॅवॉर्ड (1997), सर्वोत्तम रिसर्च पेपरकरता श्री. पोंक्षे अवॉर्ड (1998), बायो-टेक्नॉलॉजीवरील पुस्तकाकरता महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार (2002) यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 1990मध्ये फोर्ड फाउन्डेशनतर्फे तसेच 1993मध्ये इटली शासनातर्फे पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपही देण्यात आली. ते 1998मध्ये केंब्रिज विद्यापीठात चार्ल्स वॉलेस फेलो होते. त्यांनी बृहन्महाराष्ट्र ओरिएन्टल काँठोस (1999) आणि हिस्ट्री टीचर्स काँठोस (2000) यांचेही अध्यक्षपद भूषविले. याशिवाय त्यांनी रेडिओमाध्यमाकरताही लेखन केले आहे.