PRABHAKAR N. PARANJAPE
Birth Date : 29/07/1938
प्रभाकर नारायण ऊर्फ प्र. ना. परांजपे यांचा जन्म २९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांनी इंग्रजी मुख्य विषय घेऊन एम. ए.ची पदवी घेतली तसेच इंग्रजीचे भाषाविज्ञान यामध्ये एम. लिट. ही पदवी संपादन केली. परांजपे यांनी १९६३ ते १९७८ या काळात मुंबईमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. १९७८ पासून पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र-विद्या विभागात प्रपाठक आणि प्रोफेसर म्हणून काम केले. त्यांनी सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका , अक्षर दिवाळी , महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला या ग्रंथांचे संपादन केले. तसेच प्रकाशयोजना आणि नेपथ्य रचना व लिओनार्दो दा विंची या अनुवादित ग्रंथांबरोबर कविता : दशकाची पुस्तकाची संकल्पना व संयोजन केले. त्यांनी कथा, कविता व नाट्यसमीक्षा लेखनही केले. ते ग्रंथाली आणि मराठी अभ्यास परिषद या संस्थांचे संस्थापक सदस्य आहेत. काळकर्ते शिवराम महादेव परांजपे हा त्यांचा ग्रंथही प्रकाशित झाला आहे.
-
KALOKHACHE THEMB – काळोखाचे थेंब
Product Highlightsएक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो…