PHOOLANDEVI
Birth Date : 10/08/1963
Death Date : 26/07/2001
ग्रामीण उत्तर प्रदेशातील खालच्या जातीच्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या फुलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जिणं यांचा सामना केला. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं. पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली. तिला प्रेम आणि आधार देणारा माणूस नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला. त्यानंतर अनेक डाकूंनी अत्याचार केले. अपमान आणि अत्याचारांनी कल्पनेच्या बाहेर घायाळ होऊनही ती जिवंत राहिली. तीन वर्षं ती उत्तर प्रदेशातल्या जंगलांमध्ये डाकू म्हणून थैमान घालत होती. अत्याचाराची शिकार होणार्यांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अत्याचार्यांना शासन करणे, श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे, यामुळे ती लोकप्रिय झाली. सरकार हवालदिल झालं. अखेर ती शरण आली आणि मग अकरा वर्षं खटल्याशिवाय तुरुंगात तिला स्थानबद्ध केलं गेलं. 1983 मध्ये समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारने तिच्याविरुद्ध सर्व आरोप मागे घेतले आणि फुलनला सोडण्यात आले. त्यानंतर ती समाजवादी पक्षाची उमेदवार म्हणून संसदेच्या निवडणुकीसाठी उभे राहिली आणि मिर्जापूरची सदस्य म्हणून लोकसभेवर दोनदा निवड झाली. 2001 मध्ये, तिला दिल्लीतील तिच्या अधिकृत बंगल्याच्या गेटवर तिचा खून करण्यात आला.
-
MI,PHOOLANDEVI – मी,फुलनदेवी
Product Highlightsरॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने…