फिल स्टुट्झ यांनी सिटी कॉलेज, न्यू यॉर्क इथून पदवी घेतली आणि न्यू यॉर्क विद्यापीठाकडून एम.डी. प्राप्त केली. रिकर्स आयलंड इथल्या तुरुंगात सुरुवातीला त्यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्य केले. नंतर त्यांनी काही दिवस न्यू यॉर्कमध्ये खासगी व्यवसाय केला. १९८२ मध्ये लॉस एंजेलिस येथे स्थायिक होऊन तिथे त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. बॅरी मायकेल्स यांनी हार्वर्ड इथून बी.ए. पदवी घेतली. नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून कायद्याची पदवी प्राप्त केली, नंतर दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून त्यांनी एम.एस.डब्ल्यू. ही सामाजिक सेवेशी संबंधित पदवी मिळवली. १९८६पासून त्यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून खासगी व्यवसाय सुरू केला.