NARENDRA MAHURTALE
एम.ए. ( मराठी ), बी.एड महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्काराने नरेंद्र यांना सन्मानित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत त्यांची पांदणचकवा आणि प्रेमाचा कापूस ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. येरे माझ्या ढवळ्या-पवळ्या हे नाटकही प्रसिध्द झाले आहे. आजवर नरेंद्र यांनी विविध दिवाळी अंक, मासिके, रविवार पुरवण्यांमधून सातत्याने कथाकथन केले आहे. त्यांच्या अनेक कथांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. बदलत्या ग्रामीण जनजीवनाचा कथेच्या माध्यमातून वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आहे. कार्गोची कणसं हा वैदर्भीय ग्रामीण जीवनावरील कथांचा संग्रह हे त्यांचे चौथे पुस्तक असून यामध्ये मानसिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक, पारंपारिक मर्यादांची बंधने असतानाही वास्तवतेचे दर्शन घडविले आहे.
-
CARGOCHI KANSA – कार्गोचे कणसं
Product Highlightsगाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे…