MRUNALINI GADKARI
-
KRANTIYOGINI BHAGINI NIVEDITA – क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता
Product Highlightsजन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन…
Birth Date : 12/01/1949
जर्मनमधून पदवी (ऑनर्स) प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठीतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. कविवर्य बा.भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. प्राप्त केली. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि समकालीन मराठी कविता हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्स्लेशन सेंटर यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांमधून त्यांचे लेखन व त्यांनी अनुवादित केलेले साहित्य प्रकाशित झाले आहे. शिष्यवृत्त्या व पारितोषिके : पीएच.डी.साठी कै. गजानन विश्वनाथ साळवेकर शिष्यवृत्ती एम.फिल. साठी डॉ. सुहासिनी लद्दू पारितोषिक निर्बाचित कलाम या पुस्तकाला गाडगीळ भगिनी पुरस्कृत मातृ-पितृ पुरस्कार आमार मेयेबेला या पुस्तकाला डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत जी.ए. कुलकर्णी पुरस्कार देवदास या कादंबरीच्या अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार पश्चिम बंगाल सरकारमान्य, शरद समिती चा शरद पुरस्कार, १९६० महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.ए. कुलकर्णी पुरस्कार, २०११.