
MILIND JOSHI
Birth Date : 31/05/1962
मिलिंद जोशींचा जन्म पुण्यातला आणि त्यांचं सारं शिक्षणही पुण्यातच झालंय. कॉलेजात असताना वेगवेगळ्या वकृत्व आणि एकांकिका स्पर्धांमधून त्यांनी बक्षिसं पटकावली आहेत. नोकरीनिमित्त आता ते मुंबईत राहतात. लिखाणाशिवाय फोटोग्राफीचा त्यांना छंद आहे आणि त्यांचा स्वत:चा निसर्ग छायाचित्रांचा संग्रहही आहे. मिलिंद जोशींचं हे तिसरं पुस्तक. भ्रष्टाचाराचा तेहेलका आणि शहीद अशा नावांची त्यांची दोन पुस्तकं यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत. या शिवाय लोकप्रभासारख्या नियतकालिकांमधून त्यांचे लेख आणि लघुकथा वेळोवेळी प्रकाशित झाल्या आहेत. ए एम आय इंडिया लॉजिस्टीक्स या आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि लॉजिस्टीक्स कंपनीचे ते चीफ ऑपरेटींग ऑफिसर (सी ओ ओ) म्हणून काम करतात. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंग या विषयांतला त्यांचा व्यासंग दांडगा आहे आणि त्या विषयांवरचं त्यांचं लिखाण त्या व्यवसायाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून अधून-मधून प्रकाशित होत असतं.
-
EKA PARISACHI KATHA – एका परिसाची कथा
Product Highlightsसंध्याकाळ होताच सतीश बागेत आला. रचना आधीपासूनच तिथे हजर होती. तिच्या टपो-या डोळ्यांमधून प्रेम ओसंडून वाहत होतं. दोन मिनिटांपूर्वी सतीशच्या…