MILIND GADGIL
-
SANDHIKAL – संधिकाल
Product Highlights``गुरुजी, लौकिक जीवनात अशांतता... पारलौकिक जीवनाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही. कुणी तरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवण्याइतका अडाणीपणा नाही. जगण्या-मरण्यातली गूढता उकललेली…
Birth Date : 16/01/1961
मिलिंद गाडगीळ यांनी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा प्राप्त केला असून व्यवसायाने ते इंटेरिअर डेकोरेटर आहेत. त्यांची प्रकल्प ही कादंबरी १९८५ साली प्रकाशित झाली. त्यांनी सूर्योदय ह्या चित्रपटाचे पटकथासंवादलेखन केले असून तो १९८८ साली प्रकाशित झाला. त्या वर्षीच्या नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपटांतर्फे पाठवला गेलेला तो प्रथम चित्रपट ठरला. २००५ साली त्यांनी संघर्ष जीवनाचा ह्या चित्रपटाचे पटकथासंवादलेखन केले. त्यांच्या वरील दोन्ही चित्रपटांना राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटा चे पुरस्कार मिळाले आहेत. चंद्रलेखा या व्यावसायिक नाट्यसंस्थेतर्फे १९९६ साली खरंच माझ्यासाठी आणि २००४ साली पहाटवारा ही त्यांची दोन नाट्ये रंगमंचावर आली आहेत. २००५ साली मराठी नाट्य परिषद, पुणे चा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार त्यांना मिळाला.