MANJU KAPUR
-
FAMILY – फॅमिली
Product Highlightsपाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या…
मंजू कपूर दिल्लीतील मिरांडा हाऊस येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मिरांडा हाऊस येथून आपली पदवी प्राप्त करून त्यांनी कॅनडा येथील डलहौसी विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. केले. नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले. डिफिकल्ट डॉटर्स या त्यांच्या पहिल्या कादंबरीला युरेशियन विभागासाठी कॉमनवेल्थ पुरस्कार मिळाला. त्यांची आई वीरमती यांच्या आयुष्यातील घटनांचे प्रतिबिंब असणाऱ्या या कादंबरीची पार्श्वंभूमी भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आहे. इतरही अनेक दर्जेदार पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. स्त्रियांचे लेखन आता चाकोरीबद्ध वाटा सोडून काळाबरोबर चालले आहे, याचा त्यांना अतिशय आनंद वाटतो. स्त्रियांकडे जगासमोर मांडण्यासारखे विचार खूप असतात, पण त्यांना पुरेसा वाव मिळत नाही. सामान्य स्त्रिया अजूनही बऱ्याच दडपणाखाली आहेत, हे माहीत असूनही त्यांच्या लिखाणाबद्दल समाजात बरीच उत्सुकता आहे, असे त्या म्हणतात.