MANJIREE GOKHALE JOSHI
-
EK SANGU – एक सांगू
Product Highlightsसमर्पक शब्दांत दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडणारं हे मंजिरी गोखले जोशी यांचं पुस्तक समयोचितदेखील आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी प्रास्ताविकात वडील…
मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी, सध्या लंडनमधील ‘प्राइमल पिक्चर्स इन्फोर्मा बिझनेस इन्फॉर्मेशन’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्या ‘माया केअर’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्पे्रेस’मध्ये वार्ताहर म्हणून, ‘डाटाक्वेस्ट’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून, ‘इन मुंबई टेलिव्हिजन’मध्ये कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘झेंसार टेक्नॉलॉजीज्’च्या बीपीओ विभागाच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख, तसेच ‘कॉन्टॅक्ट सेन्टर प्रमुख’ म्हणून आणि ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुअरन्स’मध्ये राष्ट्रीय व्यवस्थापक, मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना ब्रिटिश उच्चायुक्तांची ‘शेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाली असून, २००६ साली यूकेमध्ये आयोजित केलेल्या ‘लीडरशीप अॅन्ड मॅनेजमेंट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडण्यात आलेल्या १२ भारतीय व्यावसायिकांमध्ये – ‘प्रोफेशनल्स’मध्ये त्यांचा समावेश होता. त्या सध्या सैद बिझनेस स्कूल, ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे विशाल प्रकल्प व्यवस्थापनाच्या मास्टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. मंजिरी गोखले जोशी यांचे पहिले पुस्तक ‘इन्स्पायर्ड’ २००६ साली प्रकाशित झाले. (सहलेखक – डॉ. गणेश नटराजन) दुसरे पुस्तक ‘क्रशेस, करिअर्स अॅन्ड सेलफोन्स’ २०११ साली प्रकाशित झाले आहे, तर तिसरे पुस्तक ‘बॉसेस ऑफ द वाइल्ड’ ‘मॅकग्रॉ हिल एज्यूकेशन’, दिल्लीतर्फे २०१३ साली प्रकाशित झाले. मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी, मिल्टन कीन्स, यूकेमध्ये राहतात. तन्वी व मही या त्यांच्या दोन मुली आहेत.