MANI BHAUMIK
-
PARMESHWAR EK SANKETIK NAV – परमेश्वर एक सांकेतिक नाव
Product Highlightsबरेच जण असे मानतात की, विज्ञानाने माणूस व परमेश्वर यांच्यामध्ये पाचर मारून त्या दोघातील अंतर वाढवत नेले आहे. कुठे आहे…
Birth Date : 30/03/1931
पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथल्या तामलुक खेड्यातील एका झोपडपट्टीत भौमिक यांचा जन्म झाला. चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ व गरिबी आदी समस्यांना तोंड देत त्यांचे बालपण गेले. त्यांनी शिष्यवृत्तीच्या साहाय्याने आपले शिक्षण पूर्ण करत पदार्थविज्ञानात खरगपूर, आय.आय.टी. येथून पीएच.डी. मिळवली. १९५९मध्ये ते स्लोन शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करण्यास गेले. त्यांचे काम पाहून १९६८मध्ये नॉरथ्रॉप कॉर्पोरेट, रिसर्च लॅबोरेटरी या जगप्रसिद्ध संस्थेने त्यांना आपल्याकडे काम करण्यासाठी बोलावले. तिथे भौमिक यांनी संशोधनातून जगातील अत्यंत कार्यक्षम असे पहिले एक्सायमर लेसर किरण तयार करणारे यंत्र निर्माण केले. या लेसर किरणांच्या साहाय्याने माणसाच्या बुबुळाच्या वक्र पृष्ठभागाला पाहिजे तसा आकार देण्याची शस्त्रक्रिया त्यांनी शोधली. यामुळे डोळ्यांचा नंबर जाऊन चश्मा किंवा लेन्सेस यांशिवाय माणसाला अधिक स्वच्छ दिसू लागते. या क्रांतिकारी शस्त्रक्रियेला लॅसिक (LASIK) असे नाव पडले. यामुळे भौमिक यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक संशोधननिबंध प्रसिद्ध आहेत. क्वांटम पदार्थविज्ञान, विश्वरचनाशास्त्र यांमध्ये लागणारे अद्भुत शोध व त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम या विषयांत त्यांना रस आहे. त्यांनी क्वांटम नावाची एक मालिका तयार केली असून, ती सध्या लोकप्रिय होत आहे. बंगालमध्ये भौमिक यांनी भौमिक एज्युकेशनल फाउंडेशन स्थापन केले आहे. त्याद्वारे अत्यंत हुशार, पण गरीब विद्याथ्र्यांना दरवर्षी मदत केली जाते.