L. S. JADHAV
-
ADGAL – अडगळ
Product Highlightsबँकेतून सेवानिवृत्त झालेले जुगा काळे हे ‘अडगळ’ या कादंबरीचे नायक. वयाच्या सहासष्टीनंतर ते लिहायला लागतात. अल्पावधीत विपुल लेखन होते. सन्मान…
Birth Date : 01/06/1945
Death Date : 05/06/2019
ल. सि. जाधव यांनी १९७२ मध्ये मराठी विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली. ते स्टेट बँकेमधून अधिकारीपदावरून निवृत्त झाले. जाधव यांचे होरपळ (मराठी), दाह (हिंदी) हे आत्मकथन, सुंभ आणि पीळ , मावळतीची उन्हे , सं गच्छध्वम या कादंबऱ्या, परतीचे पक्षी हा काव्यसंग्रह तसेच केकतीची फुले , तुमचा खेळ होतो पण... , भारत माझा देश आहे आणि शूर जवान हे बालवाङ्मय आदी लेखनसाहित्य प्रकाशित झाले आहे. जाधव यांच्या होरपळ या आत्मकथनास राज्य शासनाचा लक्ष्मीबार्ई टिळक उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, तर सुंभ आणि पीळ या कादंबरीस राज्य शासनाचा उत्कृष्ट दलित साहित्य पुरस्कार, मृत्युंजय कार शिवाजी सावंत पुरस्कार, म. सा.प.चा बा. म. जोशी पुरस्कार आणि मधुश्री पुरस्कार तसेच मावळतीची उन्हे या कादंबरीला मनोरमा फाउंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.