KHALED HOSSEINI
-
THE KITE RUNNER – द काईट रनर
Product Highlights’द काइट रनर’ ही कथा आहे आमिर आणि हसन या दोन मुलांची. आमिर हा उच्चभ्रू श्रीमंत घराण्यात जन्मलेला मुलगा. ज्याला…
Birth Date : 04/03/1965
खालिद हुसैनी यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबूल येथे ४ मार्च, १९६५ साली झाला. त्यांचे वडील परराष्ट्र मंत्रालयात राजनैतिक अधिकारी होते आणि आई काबूल येथील एका शाळेत फारसी व इतिहास शिकवत असे. १९७६ साली त्यांची बदली पॅरिसमधे झाली. १९८० मधे हुसैनी कुटुंबीयांना अफगाणिस्तानात परतायचे होते, पण तोपर्यंत कम्युनिस्ट कारवाया आणि सोव्हिएत सैन्याने केलेले आक्रमण, यामुळे त्यांना अमेरिकेत आश्रय घ्यावा लागला. खालिद यांनी तेथेच आपले शालेय व मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. मेडिकलची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी लिखाण सुरू केले. २००३ साली आलेली द काइट रनर ही त्यांची पहिली कादंबरी. ४८ देशांमधे प्रकाशित झालेली ही कादंबरी अल्पावधीतच बेस्टसेलर ठरली. २००६ साली त्यांना युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीतर्फे सदिच्छा-दूत म्हणून गौरवण्यात आले. आपल्या खालिद हुसैनी फाउंडेशन च्या माध्यमातून ते मानवहितकारी बाबींसाठी झटतात.