Birth Date : 05/04/1937
जोसेफ लेलिव्हेल्ड यांना ‘गांधी’ या विषयात फार पूर्वीपासून रस आहे. ‘द न्यू यार्क टाइम्स’साठी वार्ताहर म्हणून सुमारे चार दशके काम करत असताना त्यांनी केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या आणि भारताच्या दौर्यापासून हा त्यांच्या कुतूहलाचा विषय राहिला आहे. नंतर १९९४ ते २००१ या कालावधीत त्यांनी याच वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. ‘मूव्ह युअर शॅडो : साउथ आफ्रिका, ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ या वर्णभेदावरील त्यांच्या पुस्तकाला ‘सर्वसाधारण कथाबाह्य’ विभागात पुलित्झर पारितोषिक प्राप्त झाले. ‘ओमाहा ब्लूज : अ मेमरी लूप’ या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. ते न्यू यार्क येथे राहतात.