JONATHAN CARROLL
-
THE GHOST IN LOVE – द घोस्ट इन लव्ह
Product Highlightsएक माणूस मरण पावतो आणि विचित्र काहीतरी घडतं. तो माणूस ‘मरत’ नाही. त्यामुळे मृत्यूनंतरच्या प्रवासाकरिता त्याच्या आत्म्याला न्यायला आलेलं भूत…
Birth Date : 26/01/1949
आधुनिक फॅटसी, जादुई, वास्तववादी साहित्यर्निमिती करणारे लेखक म्हणून कॅरोल प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना घरातून लेखनाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील चित्रपटलेखन क्षेत्रात कार्यरत होते, तर आई गीतकार आणि अभिनेत्री होती. त्यामुळे घरातूनच त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन मिळाले. १९८० साली त्यांची लँड ऑफ लाफ्स ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. वाचक तसेच समीक्षकांनी या कादंबरीला उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर व्हॉइस ऑफ शॅडो , व्हाइट अॅपल्स यांसारख्या कादंबऱ्या, तसेच कथा अशी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. कल्पना, अद्भुत आणि वास्तव यांची सरमिसळ हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना वर्ल्ड फॅटसी अॅवॉर्ड , ब्रिटिश पँÂटसी अॅवॉर्ड , पुशकार्ट अॅवॉर्ड आणि ब्रॅम स्टोकर अॅवॉर्ड यांसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.