JIM MACGREGOR
-
DADLELA ITIHAS – दडलेला इतिहास
Product Highlights‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा…
जिम मॅकग्रेगरचा जन्म ग्लासगो इथे १९४७ साली झाला. अपंगांसाठी असलेल्या अर्सकिन हॉस्पिटलच्या आवारातील कॉटेजमध्ये तो लहानाचा मोठा झाला. युद्धामुळे नंतरच्या काळात घडत असलेला अनर्थ तो तिथे रोजच बघत होता. जे पाहिले त्यामुळे त्याचे मन फार खोलवर व्यथित झाले. त्या अनुभवातूनच युद्धे आणि जागतिक संघर्ष यांचे उगम वा मूळ कारणे शोधण्याची त्याला जी गोडी लागली, ती आयुष्यभरासाठीच. पंधराव्या वर्षी शाळा संपल्यावर त्याने भिन्नभिन्न प्रकारच्या नोकऱ्या केल्या. जसे की शेतमजुरी, पशुरेतन आणि औषधसंशोधन इत्यादी. त्यानंतर १९७८मध्ये त्याने डॉक्टर ही पदवी घेतली. ‘युद्धे टाळण्यात येणारे राजकीय अपयश’ याबाबत त्याला संशोधन करावयाचे होते. या संशोधनात स्वत:ला पूर्णवेळ झोकून देण्यासाठी त्याने २००१ साली वैद्यकीय व्यवसाय सोडला. त्याचे ‘कायद्याचे गर्भपात’, इराक युद्ध, जागतिक गरिबी आणि युनायटेड स्टेट्समध्ये फॅसिझमचा उदय अशा विविध विषयांवरचे असंख्य लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याने लिहिलेली ‘द इबोगा व्हिजन्स’ ही युद्धविरोधी जबरदस्त कादंबरी २००९ मध्ये प्रकाशित झाली व तिचे समीक्षकांकडून दणदणीत स्वागत/कौतुक झाले.