JAYASHREE KULKARNI
Birth Date : 02/11/1946
जयश्री कुलकर्णी यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांना लहान वयापासून लेखनाची आवड व जाण होती. वयाच्या दहाव्या वर्षीच एक मुलीसाठीची कथा साप्ताहिक गावकरी तून प्रसिद्ध झाली. अकराव्या वर्षी पाचवी इयत्तेत असताना एक टॅब्लो लिहून तो शाळेच्या स्नेहसंमेलनात सादर केला. त्यानंतर आजपर्यंत गेल्या चार दशकाहून अधिक काळ सातत्याने लेखन प्रसिद्ध होत आहे. वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके आणि विविध नामवंत दिवाळी अंकांतून त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे लेखन केले आहे. बालवाङ्मय, सामाजिक आणि कौटुंबिक कथा, रहस्यकथा, गूढकथा, भयकथा, प्रवासवृत्तांत, आकाशवाणीसाठी श्रुतिका, वास्तुविषयक माहितीपूर्ण सचित्र लेख इ. विभागांमध्ये त्यांच्या लेखणीने संचार केला आहे. त्यांच्या नावावर विविध विषयांवरची २२ पुस्तके आहेत. १९७४ साली मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात एकमेव स्त्री रहस्यकथाकार म्हणून त्यांचा खास उल्लेख केला गेला आणि त्यांची मुलाखत घेण्यात आली. लेखनासाठीचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १९६८च्या सुमारास पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते मिळालेला मराठी नाट्य परिषदेचा निबंध पुरस्कार, २०१६ साली मुंबई मराठी साहित्य संघाचा, अद्भुत गोष्टी पुस्तकासाठी उत्कृष्ट बालवाङ्मयासाठीचा मिलिंद गाडगीळ पुरस्कार हे त्यांपैकी काही पुरस्कार. आजही हंस , नवल , मोहिनी इत्यादी मराठीतल्या नामवंत मासिकांतून त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत असते.
-
MANJARACHI SAVALI – मांजराची सावली
Product Highlightsनेमाड्यांच्या पाठोपाठ मनोज सुधीराच्या खोलीत गेला. सुधीरा कॉटवर बसली होती. मनोज आणि नेमाडे खोलीत शिरताच तिने मान वळवून त्यांच्याकडे पाहिले… -
VISHVALLI – विषवल्ली
Product Highlightsसगळेजण त्याला त्वेषाने मारू लागले. त्याला फरफटत, मारतच सगळे वाड्याकडे आले आणि पायरीवर टाकून निघून गेले. शुद्धीवर आल्यावर ’पाणी पाणी’…