JANE GARDAM
-
THE MAN IN THE WOODEN HAT – द मॅन इन द वुडन हॅट
Product Highlightsएडवर्ड, बेट्टी आणि व्हेनिरिंग या प्रेमाच्या त्रिकोणात, अनेक योगायोगाने भरलेल्या आणि अतक्र्य घटना घडत जातात. विश्वासघात, फसवणूक, सूड आणि प्रेम…
Birth Date : 11/07/1928
जेन गार्डम यांचा जन्म यॉर्कशायरमध्ये झाला असून त्या केंटमध्ये राहतात. कादंबरीकार म्हणून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. आपल्या प्रदीर्घ, यशस्वी कारकिर्दीत जेन यांच्या ओल्ड फिल्थ इन २००५ ह्या पुस्तकाला ऑरेंज प्राइज नामांकन झाले होते. तसेच गॉड ऑन द रॉक्स या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना बुकर प्राइजचे नामांकन ही मिळाले होते. त्यांच्या द हॉलो लँड आणि क्वीन ऑफ द टँबोरिन या दोन पुस्तकांना दोन वर्षे व्हीटब्रेड नॉव्हेल ऑफ द इयर हे पारितोषिक मिळाले आहे. दोन वेळा हे पारितोषिक पटकावणाऱ्या त्या एकमेव लेखिका आहेत. त्यांच्या अनेक वर्षांच्या साहित्यसेवेची दखल घेऊन हेवूड हिल लिटररी प्राइज नेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कादंबऱ्याप्रमाणेच लघुकथांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांचा द पीपल ऑन द प्रिव्हिलेज हिल हा लघुकथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यातील त्याच नावाच्या प्रमुख कथेसाठी त्यांचे बीबीसी नॅशनल शॉर्ट स्टोरी अॅवॉर्डसाठी नामांकन होते. सन २००९मध्ये त्यांना ओबीई ने सन्मानित करण्यात आले आहे.