GREG CHAPPELL
-
FIT FOR 50 PLUS FOR MEN – फिट फॉर ५० प्लस मेन
Product Highlightsपन्नाशीचा गृहस्थ हा अठ्ठावीस वर्षांच्या जवानापेक्षा तंदुरुस्त असू शकतो. मध्यमवयाकडे झुकत असलेल्या पुरुषांसाठी फार साध्या आणि सोप्या भाषेत तंदुरुस्तीच्या व्यायामांची…
Birth Date : 07/08/1948
या महान अष्टपैलू खेळाडूचा जन्म दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या उनले या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मार्टिन चॅपल आणि आईचे नाव जेआन्ने चॅपल, तर आजोबांचे नाव रिचर्डसन चॅपल होते. संकटाच्या वेळी धीरगंभीर आणि तडफदारपणे वागत असत. ते उंच, सडपातळ आणि पट्टीचे खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. इयान आणि ट्रेव्हर या आपल्या भावांच्या साथीत, आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने सामने जिंकत किंवा अनिर्णित ठेवत, त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. पॅकर सिरीज मुळे त्यांची दोन वर्षे वाया गेली आणि कारकिर्दीवर थोडासा परिणाम झाला. १९८४ साली ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या नावावर ७११० धावा आणि १२२ झेलांचा जागतिक विक्रम होता. कसोटीमधून निवृत्ती हा त्यांच्या दृष्टीने केवळ कामातला बदल होता. राष्ट्रीय निवड समितीवर काम केल्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर सभासद, समालोचक आणि प्रशिक्षक अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. ऑस्ट्रेलियाचे आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करताना, त्यांची आरोग्य आणि तंदुरुस्तीविषयक समज आणि जाण वाढलेली आहे.