GIRIJA KEER
-
JANMATHEP – जन्मठेप
Product Highlightsपैशामागे लागलेले आई-वडील मुलांपुढचे आदर्श नष्ट करतात. शरीर ही प्रदर्शनाची वस्तू समजून तिची किंमत वसूल करणा-या मुली मानसिक प्रदूषणाला कारणीभूत…
Birth Date : 05/02/1933
Death Date : 31/10/2019
गिरिजा कीर यांची १०२ पुस्तके प्रसिद्ध असून त्यात बालवाङ्मयाची २९ पुस्तके आहेत. पुरस्कार – एकूण पुरस्कार ४९, त्यातले ४ राज्य पुरस्कार. महत्त्वाचे पुरस्कार – महाराष्ट्र मंडळ, न्यू यॉर्क यांच्या माध्यमातून कथासम्राज्ञी पुरस्कार ह.ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – साहित्य परिषद, पुणे. कमलाबाई टिळक पुरस्कार – पुणे मराठी ग्रंथालय. अभिरुची पुरस्कार – मराठी वाङ्मय परिषद बडोदे. श्री अक्षरधन स्त्री-साहित्यिका पुरस्कार, मुंबई. आत्मचरित्राला चार पुरस्कार – (गोवा, परभणी, कोरेगाव, को.म.सा.प. इत्यादी). ग्रंथोत्तेजक संस्था, पुणेतर्फे २०१२ साली जन्मठेप या पुस्तकास पुरस्कार. सन्मान – वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक. बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (कोल्हापूर, सेलू, सावंतवाडी या ठिकाणी). अ.भा. मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षा (चंद्रपूर, अमरावती, आवास, महाबळेश्वर). कथाकथनाचे २०००च्यावर कार्यक्रम, अमेरिकेत कथाकथन सम्राज्ञी असे मानपत्र. ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था, फोंडा – गोवा आयोजित लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा. कोकण मराठी साहित्य परिषद – मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. इंदिराजी वीरांगना अ.भा. महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा – पुणे. १६ वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पात सहभाग. १२ वर्षे जन्मठेपेच्या गुन्हेगारांसाठी तुरुंगात जाऊन कैद्यांशी सुसंवाद व समुपदेशन (येरवडा जेल – पुणे; आधारवाडी जेल – कल्याण; अग्वाद जेल – गोवा; कळंबा जेल – कोल्हापूर). बालगुन्हेगारांसाठी कथाकथन ( जन्मठेप , इथं दिवा लावायला हवा , राखेतली पाखरं ही तीन पुस्तकं सामाजिक कार्याच्या अनुभवावर प्रसिद्ध). समाजकार्यासाठी एकूण ६ पुरस्कार व सन्मान. सह्याद्री वाहिनीवर, झी व ई-टीव्ही अशा वाहिन्यांवर दीर्घ मुलाखती. दूरदर्शन व आकाशवाणी यांवर अनेक कार्यक्रम. मुंबईतल्या अनेक शाळांतून फिरून, मराठी वाचन-लेखन यावर चर्चा, कृतिसत्रे. मराठी कथा, मुलाखती यांचे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु या भाषांत भाषांतरे. उडिया भाषेत मनबोली या कथासंग्रहाचे मनकथा या नावाने भाषांतर. कथाजागर या कथासंग्रहाचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध होणार आहे.