GEORGINA HARDING
-
HERGIRICHA PORKHEL – हेरगिरीच्या पोरखेळ
Product Highlightsएका गारठलेल्या सकाळी आठ वर्षांच्या अॅनाची आई घराबाहेर पडते आणि गर्द धुक्यात हरवून जाते.... या घटनेकडे फिरून पाहताना अॅनाला वाटते…
Birth Date : 11/06/1955
जॉजिना हार्डिंग यांची द सॉलिट्युड ऑफ थॉमस केव्ह ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यांनी वाचक तसेच समीक्षक यांचे लक्ष वेधले. त्यानंतर त्यांची द स्पाय गेम ही कादंबरी प्रकाशित झाली आणि त्यालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पेन्टर ऑफ सायलेन्स या कादंबरीला २०१२ सालच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑरेंज प्राइज साठी नामांकन मिळाले होते. कादंबरी लेखनाकडे वळण्याआधी जॉजिना यांनी १९८८मध्ये इन अनदर युरोप : जर्नी अॅक्रॉस हंगेरी अॅन्ड रोमानिया हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी बाइकवरून केलेल्या व्हिएन्ना ते इस्तंबूल या प्रवासाचे अनुभवकथन होते. त्यानंतर भारताच्या कोरोमंडल किनाऱ्यावरील छोट्या-छोट्या गावांतील मच्छिमारांचे जीवन चितारणारे ट्रँकबार : अ सीझन इन साउथ इंडिया हे पुस्तक लिहिले. लंडन येथे वास्तव्यास असलेल्या जॉजिना स्टुर व्हॅली, ईसेक्स येथल्या फार्म हाउसवरही राहतात.