ERNEST HEMINGWAY
-
GHANGHANTO GHANTANAD – घणघणतो घंटानाद
Product Highlights‘घणघणतो घंटानाद’ हे दि. बा. मोकाशी यांचे पुस्तक मूळ लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीवर…
Birth Date : 21/07/1899
Death Date : 02/07/1961
विसाव्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कथा-कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘कान्सास सिटी स्टार’ या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केली. १९२५ साली त्यांचे मिशिगनमधील बालपणीच्या अनुभवांवर आधारित पहिले महत्त्वाचे पुस्तक ‘इन अवर टाइम’ प्रकाशित झाले. १९२६ साली ‘द सन ऑल्सो राइझेस’ आणि १९२९ साली ‘अ फेअरवेल टू आम्र्स’ नावाच्या पहिल्या महायुद्धावर आधारीत कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. यात पहिल्या महायुद्धाच्या विध्वसंक अनुभवाने हताश झालेल्या तरूण पिढीचे चित्रण हेमिंग्वे यांनी केले आहे. १९३७ साली प्रकाशित ‘टू हॅव अँड हॅव नॉट’ ही कादंबरी आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीची, ‘फॉर हूम द बेल टोल्स’ (१९४०) ही स्पॅनिश यादवी युद्धावर आधारीत महाकाव्यसदृश कादंबरी, ‘अॅक्रॉस द रिव्हर अँड इन्टू द ट्रीज’ (१९५०) ही दुसऱ्या महायुद्धानंतर एका प्रेमसंबंधांवर आधारीत कादंबरी, अशा विविध विषयांवर हेमिंग्वे यांनी विपुल लिखाण केले. हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. त्यांनी सुमारे ५० कथा लिहिल्या असून त्यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. १९५४ साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील सर्वाधिक मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.